मंत्रिमंडळ

तवांग  येथील सशस्त्र सीमा दलाची 5.99 एकर जमीन अरुणाचल प्रदेश सरकारला हस्तांतरित करायला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 04 JUL 2018 6:31PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 4 जुलै 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने तवांग  येथील सशस्त्र सीमा दलाची 5.99 एकर जमीन मेगा फेस्टिवल कम बहुउद्देशीय मैदानाच्या बांधकामासाठी अरुणाचल प्रदेश सरकारला हस्तांतरित करायला मंजुरी दिली.

 अरुणाचल प्रदेश सरकार ने पार्किंग सुविधा (4.73 एकर )आणि  रिंग रोड  (1.26 एकर ) सह मेगा फेस्टिवल कम बहुउद्देशीय मैदानाच्या बांधकामासाठी तवांग येथे एसएसबी  संकुलातील  5.99 एकर  जमिनीची निवड केली आहे. त्यानुसार  राज्‍य सरकारने ही  5.99 एकर  जमीन हस्‍तांतरित करण्याची विनंती केली होती.

भारत सरकारने  (ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय) मार्च, 2016 मध्येच  अरुणाचल प्रदेश मधील  तवांग येथे  पार्किंग सुविधा आणि योग्य रस्त्यासह मेगा-फेस्टिवल-कम- बहुउद्देशीय मैदानाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. या बहुद्देशीय मैदानाचा वापर विविध  पर्यटन महोत्सवांच्या आयोजनासाठी केला जाईल.

 

N.Sapre/S.Kane/P.Kor



(Release ID: 1537807) Visitor Counter : 59


Read this release in: English