मंत्रिमंडळ

त्रिपुरातील आगरतळा विमानतळाचे महाराजा वीर विक्रम माणिक्य किशोर विमानतळ असे नामकरण करायला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 04 JUL 2018 6:03PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 4 जुलै 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने त्रिपुरातील आगरतळा विमानतळाचे महाराजा वीर विक्रम माणिक्य किशोर विमानतळ, आगरतळा असे नामकरण करायला मंजुरी दिली आहे. त्रिपुरातील जनतेकडून प्रदीर्घ काळ होत असलेली मागणी लक्षात घेऊन तसेच महाराजा वीर विक्रम माणिक्य किशोर यांना त्रिपुरा सरकारची आदरांजली म्हणून हा निर्णय घेण्यात आला.

 

S.Tupe/S.Kane/P.Kor


(Release ID: 1537691)
Read this release in: English