उपराष्ट्रपती कार्यालय
जीवनाची गुणत्ता सुधारण्यासाठी संगणकीय, दळणवळण आणि रोबोटिक्स क्षमता वृद्धिंगत करण्याची गरज : उपराष्ट्रपती
प्रा. महालनोबिस द्रष्टे सांख्यिकीशास्त्रज्ञ : उपराष्ट्रपती
Posted On:
29 JUN 2018 6:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जून 2018
जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी संगणकीय, दळणवळण आणि रोबोटिक्स क्षमता वृद्धिंगत करण्याची गरज उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. ते आज कोलकाता इथे प्रा. महालनोबिस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री डी.व्ही.सदानंद गौडा यावेळी उपस्थित होते.
प्रा. महालनोबिस द्रष्टे सांख्यिकीशास्त्रज्ञ होते. भारतीय उपखंडाला त्यांनीच सांख्यिकीशास्त्राची ओळख करुन दिली. राष्ट्रीय विकास आणि सामाजिक सबलीकरण यासाठी सांख्यिकीशास्त्राचा साधन म्हणून वापर करण्याची संकल्पनाही त्यांचीच होती, असे सांगून नायडू यांनी महालनोबिस यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेतला.
शालेय, महाविद्यालयीन आणि विद्यापीठ स्तरावर गणित अध्यापनाची गुणवत्ता अधिक वृद्धिंगत करण्याची आवश्यकता उपराष्ट्रपतींनी प्रतिपादित केली.
राष्ट्र उभारणीत प्रत्येक नागरिकाने सक्रिय भूमिका बजावली पाहिजे. लोक केवळ लाभार्थी न राहता बदलाचे दूत झाले पाहिजेत, असे मतही उपराष्ट्रपतींनी व्यक्त केले.
Samarjeet/S.Kulkarni/P.Malandkar
(Release ID: 1537203)
अभ्यागत कक्ष : 170