आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

एक्स्पोर्ट क्रेडीट गॅरेंटी कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये भांडवली गुंतवणुकीला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 27 JUN 2018 6:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27  जून  2018

 

एक्स्पोर्ट क्रेडीट गॅरेंटी कॉर्पोरेशन मर्यादितला वित्तीय सशक्त करण्यासाठी  2000 कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीला मंत्रिमंडळाच्या  अर्थ विषयक समितीने मंजुरी दिली आहे.तीन वित्तीय   वर्षात ही भांडवली  गुंतवणूक केली जाणार आहे. 2017- 18  या वर्षात 50 कोटी,2018- 19 या वर्षात 1450  कोटी,2019-20 या वर्षात 500 कोटी रुपयांची ही गुंतवणूक राहणार आहे

यामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी निर्यात वाढणार असून आफ्रिका, सी आय एस आणि लॅटीन  अमेरिका या उदयोन्मुख  बाजारपेठांना भारतातर्फे निर्यात वाढवून निर्यातीला बळकटी मिळणार आहे. भांडवली गुंतवणुकीमुळे ईसीजीसी, भारतीय निर्यातदारांना नव्या बाजारपेठाचा शोध घेण्यासाठी अधिक मदत करू शकणार आहे. यामुळे ईसीजीसी, उत्पादन वैविध्यता आणण्याबरोबरच निर्यातदारांना कमी दरात विमा कवच पुरवू शकणार आहे ज्यामुळे त्यांना खडतर बाजारपेठात पाय रोवता येणार आहे. ईसीजीसीच्या विमा कवचाचा लाभ घेणाऱ्या ग्राहकात 85 % पेक्षा जास्त सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आहेत. ईसीजीसी जगातल्या सुमारे 200 देशांसाठी  निर्यात  विमा उपलब्ध करते.

पूर्वपीठीका

ईसीजीसी, ही देशातल्या निर्यातीला चालना  देण्यासाठी, केंद्र सरकारची निर्यात पत विमा सेवा पुरवणारी एक प्रमुख एजन्सी आहे.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 


(Release ID: 1536817) Visitor Counter : 111


Read this release in: English