आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

नॅशनल एक्स्पोर्ट इन्शुरन्स अकाऊंट ट्रस्ट साठी निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

प्रविष्टि तिथि: 27 JUN 2018 5:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27  जून  2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अर्थ विषयक केंद्रीय समितीने नॅशनल एक्स्पोर्ट इन्शुरन्स अकाऊंट ट्रस्टला (NEIA) 1,040 कोटी रुपये अनुदानपर मदत द्यायला मंजुरी दिली आहे.

या निधीचा वापर  2017-18 ते  2019-20 या तीन वर्षात केला जाईल. वर्ष 2017-18 साठी 440 कोटी रुपये याआधीच मिळाले आहेत. वर्ष 2018-19 आणि  2019-20 साठी एनईआयएला प्रत्येकी 300 कोटी रुपये दिले जातील.

या निधीमुळे एनईआयए देशातील धोरणात्मक आणि राष्ट्रीय महत्वाच्या निर्यात  प्रकल्पाना अर्थसहाय्य पुरवण्यास समर्थ असेल.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 1536793) आगंतुक पटल : 75
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English