आयुष मंत्रालय
योगाभ्यासाच्या प्रोत्साहन आणि विकासासाठी अमुल्य योगदान दिलेल्यांना पंतप्रधान पुरस्कार 2018 जाहीर
प्रविष्टि तिथि:
20 JUN 2018 6:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जून 2018
नाशिकचे विश्वास मंडलिक आणि मुंबईची ‘द योगा इन्स्टिट्यूट’ या संस्थेला योगाभ्यासाला प्रोत्साहन आणि विकासात अमुल्य योगदान दिल्याबद्दल 2018च्या पंतप्रधान पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे. विविध गटांमध्ये मिळालेल्या 186 अर्जांमधून ही निवड करण्यात आली आहे.
21 जून 2016 रोजी दुसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनी पंतप्रधानांनी या पुरस्काराची घोषणा केली होती. आयुष मंत्रालयाने या पुरस्कारासाठी मार्गदर्शक तत्व विकसित केली होती. पुरस्कारांच्या पारदर्शक प्रक्रियेसाठी स्क्रिनिंग आणि मुल्यमापन समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या.
स्मृति चिन्ह, प्रमाणपत्र आणि 25 लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
B.Gokhale/S.Kane/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1536046)
आगंतुक पटल : 126
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English