शिक्षण मंत्रालय

सरकारी शाळांमधील शिक्षक आता राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी थेट अर्ज करु शकतील – प्रकाश जावडेकर

Posted On: 20 JUN 2018 5:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जून 2018

 

सरकारी शाळांमधील शिक्षक आता राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी आपले नाव पाठवू शकतील. हा नवीन निर्णय असून, यापूर्वी राज्य सरकारकडून शिक्षकांचे अर्ज निवडले जायचे, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. नवीन प्रणाली सरकारी शिक्षक / शाळा प्रमुख आता स्वत:ला ऑनलाईन नामनिर्देशित करु शकतील. प्रत्येक जिल्ह्यातून 3 शिक्षक, तर प्रत्येक राज्यांतून 6 शिक्षकांची निवड केली जाईल. राष्ट्रीय स्तरावरील स्वतंत्र परिक्षक, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी 50 सर्वोत्तम शिक्षकांची निवड करतील. शिक्षण व्यवस्थेत केलेले क्रांतीकारी बदल, शिकवण्याची शैली आणि संशोधनाच्या आधारे ही निवड केली जाईल.

राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमधील सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमधील शिक्षक, केंद्रीय विद्यालये, जवाहर नवोदय विद्यालये, केंद्रीय तिबेट विद्यालये, सैनिकी शाळा, अणुऊर्जा शिक्षण संस्थेच्या शाळा आणि सीबीएससी आणि सीआयएससीई शाळांमधील शिक्षक राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

 

 

 

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 

 



(Release ID: 1536041) Visitor Counter : 69


Read this release in: English