आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

आयुष्यमान भारत- राष्ट्रीय आरोग्य संरक्षण अभियानाच्या अंमलबजावणीसाठी 20 राज्यांनी केल्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

Posted On: 14 JUN 2018 5:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14  जून  2018

 

आयुष्यमान भारत-राष्ट्रीय आरोग्य संरक्षण अभियानाच्या अंमलबजावणीसाठी कटिबद्धता दर्शवण्यासाठी 20 राज्यांनी या संदर्भातल्या सामंजस्‍य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. आरोग्यमंत्र्यांच्या परिषदेत केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांच्यासमवेत या 20 राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांनी या सामंजस्य कराराची देवाण-घेवाण केली.

या उपक्रमामुळे देशातले आरोग्य विषयक चित्रच पालटले असा विश्वास नड्डा यांनी व्यक्त केला. राज्यांच्या सक्रीय सहभागावरच या योजनेचे यश अवलंबून आहे यावर त्यांनी भर दिला.

या अभियानामुळे सुमारे 50 कोटी जनतेला आरोग्यविषयक खर्चाबाबत दिलासा मिळणार आहे. प्रतिवर्ष पाच लाख रुपयांपर्यंतच्या सेवा लाभार्थीच्या कुटुंबियांना मिळणार आहेत.

N.Sapre/N.Chitale/P.Malandkar



(Release ID: 1535547) Visitor Counter : 125


Read this release in: English