आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

कृषी शिक्षण विभाग आणि आयसीएआर संस्थेच्या तीन वर्षीय कृती योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 13 JUN 2018 10:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13  जून  2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने, भारतातील उच्च शिक्षणाच्या विकास आणि बळकटीकारणासाठी 2,225.46 कोटी रुपये खर्चाच्या (2197.15 कोटी रुपये + 27.55 कोटीरुपये (राज्य हिस्सा) एआयसीआरपी-एचएससाठी वेतन घटक म्हणून) कृषी विभाग आणि आयसीएआर संस्थेच्य तीन वर्षीय कृती योजनेच्या (2017-2020) विस्ताराला आज मंजुरी दिली. त्यात खालील गोष्टींचा समावेश आहे:

  1. भारतातील उच्च शेती शिक्षण बळकट करणे आणि विकास - रु .2050 कोटींचा रु.
  2. आयसीएआर-कृषी संशोधन व्यवस्थापन राष्ट्रीय अकादमी (नारम) - रु. 24.25 कोटी

आणि

  1. आयसीएआर - ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड रिसर्च प्रोजेक्ट ऑन होम सायन्स सह केंद्रीय कृषी महिला संस्था-151.21 कोटी रुपये.

            उच्च कृषी शिक्षण संस्थांमधून दर्जेदार मनुष्यबळ निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे. यात अनेक नवीन उपक्रमांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत हरित उपक्रमांची, शिक्षकांची कमतरता पडू न देणे , आंतरराष्ट्रीय मानांकन, माजी विद्यार्थ्यांचा सहभाग, नवकल्पनांचा प्रचार करणे, शैक्षणिक संवाद, तंत्रज्ञान सक्षम शिक्षण, पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप, कृषि शिक्षण पोर्टल, वैज्ञानिक सामाजिक जबाबदारी . बाबींवर लक्ष दिले जाईल.

यामुळे स्पर्धात्मक आणि आत्मविश्वासपूर्ण मनुष्यबळ तयार होईल. याव्यतिरिक्त, शेती आणि संबंधित क्षेत्रातील लिंगविषयक समस्यांवर संशोधन, लिंग-समान न्याय शेतीधोरणे / कार्यक्रम आणि लिंग-संवेदनशील कृषी-क्षेत्रीय प्रतिसादांची जबाबदारी आयसीएआर-सीआयडब्ल्यूए घेईल. राष्ट्रीय कृषी संशोधन आणि शिक्षण प्रणाली (एनएआरईएस) ची मदत घेण्यात येईल ज्यामुळे शेतकरी, युवा शास्त्रज्ञ, विद्यार्थी आणि कृषी उद्योग यांच्यासह भागधारकांची क्षमता आणि क्षमतेत वाढ होईल.

पार्श्वभूमी:

भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) देशभरात स्थापित 75 कृषी विद्यापीठांसह (एयूएस) भागीदारी करून उच्च कृषी शिक्षणात नियोजन, विकास, समन्वय साधते. कृषी परिस्थितीमध्ये स्वयंपूर्णता प्राप्त करण्यामध्ये कृषी विद्यापीठे द्वारे विकसित मनुष्यबळाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

कौशल्य वृद्धीच्या समस्याचे निराकरण, कृषी शिक्षणासाठी प्रतिभावान युवकांना आकर्षित करणे आणि या क्षेत्रातील संपूर्ण पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे असा व्यापक दृष्टीकोन आहे

कृषी संशोधन, शिक्षण आणि तंत्रज्ञान व्यवस्थापन क्षेत्रात राष्ट्रीय कृषी संशोधन आणि शिक्षण प्रणाली च्या व्यक्ती आणि संस्थांच्या क्षमता वृधीमध्ये नाराम ने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

N.Sapre/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 



(Release ID: 1535449) Visitor Counter : 92


Read this release in: English