आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

मे . एचडीएफसी बँकेचे अतिरिक्त भाग भांडवल 24 हजार कोटी रुपयांच्या कमाल मर्यादेपर्यंत वाढवायला मंत्रिमंडळाची मंजुरी

बँकेतील संमिश्र परदेशी हिस्सेदारी बँकेच्या वाढीव पेड-अप समभाग भांडवलाच्या 74 टक्के पर्यंत सीमित

Posted On: 13 JUN 2018 10:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13  जून  2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मे . एचडीएफसी बँक लिमिटेडला 24 हजार कोटी रुपयांपर्यंत अतिरिक्त भाग भांडवल वाढवायला परवानगी देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यात  पूर्वी मंजुरी दिलेल्या 10 हजार कोटी रुपयाच्या मर्यादेवरील प्रीमियम समाविष्ट आहे, ज्यात बँकेतील संमिश्र परदेशी हिस्सेदारी बँकेच्या वाढीव पेड-अप समभाग भांडवलाच्या 74 टक्के पेक्षा अधिक नसेल.

यासाठी परदेशी थेट गुंतवणूक धोरणाच्या अटी आणि अन्य क्षेत्रीय नियमन / मार्गदर्शक तत्वे लागू असतील.

प्रस्तावित गुंतवणुकीमुळे बँकेचे भांडवल पर्याप्त गुणोत्तर मजबूत होईल अशी आशा आहे.

N.Sapre/S.Kane/P.Malandkar


(Release ID: 1535448) अभ्यागत कक्ष : 74
Read this releasein: English