मंत्रिमंडळ

ईशान्य परिषदेच्या पुनर्स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 13 JUN 2018 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13  जून  2018

 

सर्व आठ ईशान्य राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह एका वैधानिक संस्थेला ईशान्य परिषदेच्या अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याच्या ईशान्य विकास विभागाच्या मंत्रालयाच्या प्रस्तावाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. ईशान्य प्रदेश विकास मंत्रालायच्या राज्यमंत्र्यांना  (स्वतंत्र प्रभार) या परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम करायला देखील मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

 प्रभाव:

राज्य आणि केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून एनईसी विविध प्रकल्पांची अंमलबजावणी करतात. गृहमंत्री अध्यक्ष आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाचे मंत्री उपाध्यक्ष या नवीन व्यवस्थेसह एनईसी आणि ईशान्य राज्यांचे सर्व राज्यपाल आणि मुख्यमंत्री सदस्य म्हणून भविष्यात आंतरराज्यीय बाबींवर अधिक व्यापक चर्चा करण्याकरिता आणि सर्वसाधारण दृष्टिकोण लक्षात घेण्याकरिता मंच उपलब्ध करून दिला आहे.

 एनईसी च्या पुनर्स्थापानेमुळे ही परिषद आता  ईशान्य क्षेत्रासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करेल.

परिषदेमध्ये प्रकल्प / योजना अंमलबजावणीचा वेळोवेळी आढावा घेतला जाईल; या प्रकल्पांसाठी राज्य सरकारांमध्ये समन्वय साधण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची शिफारस केली जाईल.

 

N.Sapre/S.Mhatre/P.Malandkar



(Release ID: 1535438) Visitor Counter : 102


Read this release in: English