इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
देशातील सर्व सामायिक सेवा केंद्रे बँकांची व्यापार प्रतिनिधी होतील-पियुष गोयल
पंतप्रधान 15 जूनला सीएससी व्हीएलईंना संबोधित करणार
Posted On:
11 JUN 2018 6:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जून 2018
ग्रामीण वायफाय नेटवर्क सुविधेला चालना देणाऱ्या गावस्तरीय उद्योजकांनी (व्हीएलई) केलेल्या प्रगतीचे दर्शन घडवणाऱ्या महत्त्वाच्या सुविधांचा शुभारंभ आज केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते एका परिषदेत झाला. यात 5000 गावांना इंटरनेट जोडणी, सीएससी (सामायिक सेवा केंद्रे) आणि आयआरसीटीसीमध्ये सामंजस्य करार यांचा समावेश आहे. तसेच 3 लाख उमेदवारांच्या डिजिटल साक्षरतेसाठी इंडसइंड बँक सीएससी एसपीव्हींना सहकार्य करत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जूनला सीएसई व्हीएलईंना संबोधित करणार असल्याची घोषणा प्रसाद यांनी केली.
वित्त, रेल्वे आणि कोळसा मंत्री पियुष गोयल या परिषदेला उपस्थित होते. आता 2 लाख 90 हजार सामायिक सेवा केंद्रे व्यापार प्रतिनिधी म्हणून काम करण्यास सक्षम असल्याचे गोयल यांनी जाहीर केले. डिजिटल तंत्रज्ञानाच्या विस्तरामुळे सकल देशांतर्गत उत्पादनात 5 टक्क्यांची भर पडेल असे ते म्हणाले.
N.Sapre/S.Kulkarni/P.Kor
(Release ID: 1535067)
Visitor Counter : 104