रेल्वे मंत्रालय

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते ‘मेन्यू ऑन रेल्स’ या नव्या ॲपचा शुभारंभ

Posted On: 11 JUN 2018 4:41PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 11 जून 2018

 

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते आज ‘मेन्यू ऑन रेल्स’ या नव्या ॲपचा शुभारंभ झाला. प्रवासादरम्यान पुरवण्यात येणाऱ्या खानपान सेवेची माहिती या ॲपवर आहे. सर्व रेल्वेगाड्यांमधल्या मेन्यूची माहिती या ॲपवर असेल. तिकिटाचे आरक्षण करतानाच खानपानसेवेसाठी नोंदणी कराव्या लागणाऱ्या राजधानी/शताब्दी/दुरान्तो गटातील रेल्वेगाड्यांमधले तसेच तेजस आणि गतिमान गाड्यांमधले आहारबेत या ॲपवर असतील. पदार्थांच्या किमती करासहीत असतील. ॲण्ड्राईड आणि आयओएसवर हे ॲप उपलब्ध असेल.

 

N.Sapre /S.Kulkarni/P.Kor


(Release ID: 1535042) अभ्यागत कक्ष : 141
Read this releasein: English