पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय

स्वच्छ भारत योजनेअंतर्गत ग्रामीण स्वच्छतेचे उद्दिष्ट 85 टक्के साध्य

प्रविष्टि तिथि: 08 JUN 2018 8:28PM by PIB Mumbai

 

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत देशातील गावांचा चेहरामोहरा बदलतो आहे. या अभियानाअंतर्गत ग्रामीण स्वच्छतेचे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. गावातल्या समुदायांनी एकत्र येऊन आतापर्यंत 7.4 कोटी शौचालये बांधली आहेत. तसेच 3.8 लाख गावे आणि 391 जिल्हे हागणदारीमुक्त घोषित करण्यात आले आहेत.

या अभियानाअंतर्गत सर्व गावांमध्ये अत्यंत वेगाने काम सुरू आहे. एका स्वतंत्र संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार 6 हजार गावांमधील 90 हजार घरांमध्ये आता शौचालये वापरली जातील. प्रमाण 93.4 टक्के आहे.

हागणदारीमुक्त आणि शौचालय बांधणी अशा दोन्ही उद्दिष्टांसाठी काम करणारे स्वच्छ भारत अभियान देशातले पहिलेच अभियान आहे. या दोन्ही उद्दिष्टांमुळे ग्रामीण जनतेत तळागाळापर्यंत स्वच्छतेची जाणीव निर्माण झाली आहे आणि हे अभियान खऱ्या अर्थाने जन चळवळ झाली आहे.

 

N.Sapre/R.Aghor/P.Kor

 


(रिलीज़ आईडी: 1534944) आगंतुक पटल : 137
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English