पंतप्रधान कार्यालय

चीनच्या चिंगदाओ दौऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधानांनी केलेले निवेदन

Posted On: 08 JUN 2018 8:31PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 8 जून 2018

 

चीनमधील चिंगदाओ शहराच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन खालीलप्रमाणे :

शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रप्रमुखांच्या वार्षिक बैठकीत सहभागी होण्यासाठी मी आज चीनच्या चिंगदाओ शहरात जात आहे.

"या संघटनेचे स्थायी सदस्यत्व मिळाल्यानंतर प्रथमच होणाऱ्या बैठकीत भारतीय प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी मला मला मिळाली याचा मला विशेष आनंद आहे. शांघाय सहकार्य सघंटनेचे उद्दिष्ट अत्यंत व्यापक सहकार्याचे असून त्यात दहशतवाद, फुटीरतावाद आणि अतिरेकी संघटनांशी लढा देणे, त्याशिवाय संपर्कयंत्रणा बळकट करणे, वाणिज्य, सीमाशुल्क, कायदे, आरोग्य आणि कृषी, पर्यावरण संरक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन आणि जनतेमधील सुसंवाद वाढवणे, अशा व्यापक विषयांचा यात समावेश करण्यात आला आहे.

गेल्या एका वर्षांपासून म्हणजे, भारत शांघाय सहकार्य परिषदेचा स्थायी सदस्य झाल्यापासून, भारताची या संस्थेशी आणि तिच्या सदस्य राष्ट्रांशी सातत्याने या सर्व विषयांवर चर्चा सुरु आहे. शांघाय सहकार्य संघटनेचा हा अजेंडा अधिक ठोस आणि व्यापक करण्यात, चिंगदाओ परिषद उपयुक्त ठरेल असा मला सशवास वाटतो.

शांघाय सहकार्य संघटनेच्या सर्व सदस्य राष्ट्रांशी भारताचे अत्यंत घनिष्ट आणि बहुआयामी संबंध आहेत. या परिषदेच्या निमित्ताने, या सर्व सदस्य देशांच्या प्रमुखांशी आणि इतर नेत्यांशी द्वीपक्षीय चर्चा करण्याची संधी मला मिळेल अशी अपेक्षा आहे."

 

N.Sapre/R.Aghor/P.Kor

 



(Release ID: 1534940) Visitor Counter : 103


Read this release in: English