रेल्वे मंत्रालय
रेल्वेच्या संपर्कातील बालकांच्या रक्षणासाठी जनजागृती मोहिमेचे उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
07 JUN 2018 5:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जून 2018
रेल्वेच्या संपर्कात येणाऱ्या बालकांच्या रक्षणासाठीच्या जनजागृती मोहिमेचे उद्घाटन रेल्वे मंडळाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी यांनी आज केले. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष स्तुती काकेर यांच्यासह इतर मान्यवरही यावेळी उपस्थित होते.
प्रवासी, घरुन पळून आलेली मुले तसेच पळवून नेण्यात आलेली मुले रेल्वेच्या संपर्कात येत असतात, अशा बालकांच्या रक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी ही मोहिम राबवली जाणार आहे. देशभरातील 18 रेल्वे स्थानकांवर अशा बालकांच्या रक्षणासाठी यंत्रणा कार्यरत असून, आता 174 स्थानकांवर ही यंत्रणा राबवली जाणार असल्याची माहिती लोहानी यांनी यावेळी दिली.
या उपक्रमाच्या उद्घाटनानंतर विविध सामाजिक संस्थांमधील बालकांनी बाल हक्कांसंदर्भात एक पथनाट्य सादर केले. तसेच आयोजकांतर्फे बाल हक्कांबाबत आणि रेल्वेच्या संपर्कात येणाऱ्या बालकांच्या संरक्षणासंदर्भातील एक पोस्टर प्रकाशित करण्यात आले.
B.Gokhale/M.Pange/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1534799)
आगंतुक पटल : 153
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English