मंत्रिमंडळ

अवकाश नियोजन,जलव्यवस्थापन आणि गतिशीलता व्यवस्थापन या क्षेत्रात परस्पर सहकार्य करण्याविषयी भारत आणि नेदरलँड यांच्यात झालेल्या कराराला मुदतवाढ देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 06 JUN 2018 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जून 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, भारत आणि नेदरलँड यांच्यात अवकाश नियोजन, जलव्यवस्थापन आणि गतिशीलता व्यवस्थापन या क्षेत्रात परस्पर सहकार्य करण्याविषयी एप्रिल 2018 मध्ये झालेल्या कराराचा आढावा घेण्यात आला. तसेच या कराराला मुदतवाढ देण्यात आली.

या कराराअंतर्गत, अवकाश नियोजन,जलव्यवस्थापन आणि गतिशीलता व्यवस्थापन या क्षेत्रात परस्पर सहकार्य अधिक वृद्धिंगत केले जाईल. त्यासाठी समतोल विकास, परवडणारी घरे, स्मार्ट सिटी विकास, सांडपाणी आणि पाणीपुरवठ्यासाठी जीआयएस व्यवस्था, स्वच्छ पाणी संवर्धन, एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रात दोन्ही देशांच्या गरजा लक्षात घेऊन परस्पर सहकार्य केले जाणार आहे. 

या कराराच्या अंमलबजावणीसाठी एक संयुक्त कृतीगट स्थापन केला जाईल. ह्या कृतीगटाच्या वर्षातून एकदा, दोन्ही देशात बैठका होतील.  या करारामुळे नागरी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात दृढमजबूत आणि दीर्घकालीन संबंध निर्माण हितील. तसेच, कराराच्या अंमलबजावणीमुळे अवकाश नियोजन, जलव्यवस्थापन आणि गतिशीलता व्यवस्थापन अशा क्षेत्रात रोजगारनिर्मिती होणे अपेक्षित आहे.

 

 

B.Gokhale/R.Aghor/D.Rane

 

 



(Release ID: 1534701) Visitor Counter : 92


Read this release in: English