आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

ऑफ-ग्रीड आणि विकेंद्रित सौर पीव्ही वापर कार्यक्रम-टप्पा III ला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 06 JUN 2018 6:59PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जून 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अर्थ विषयक केंद्रीय समितीने 2020 पर्यत अतिरिक्त 118 एमडब्लूपी (मेगा वेट पीक ) ऑफ-ग्रीड सौर पीव्ही क्षमता साध्य करण्यासाठी ऑफ-ग्रीड आणि विकेंद्रित सौर पीव्ही ऍप्लिकेशन  कार्यक्रम-तिसरा टप्पा राबवायला मंजुरी दिली आहे.

ऑफ-ग्रिड आणि विकेंद्रित  सौर पीवी (फोटो वोल्टिक)ऍप्लिकेशन  कार्यक्रमाच्या तिसर्या टप्प्यात पुढील भाग आहेत :

1. सौर पथ  दिवे

2. एकल सौर ऊर्जा प्रकल्प

3. सौर स्टडी लॅम्प

ईशान्य राज्ये , डोंगराळ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश वगळता अन्य भागात पथदिवे आणि सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी एकूण खर्चाच्या 30 % अर्थसहाय्य पुरवले जाईल. ईशान्य राज्ये, डोंगराळ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात एकूण खर्चाच्या 90 % अर्थसहाय्य पुरवले जाईल. सौर स्टडी लॅम्प साठी विद्यार्थ्यांना केवळ 15 % खर्च सोसावा लागेल.

तिसऱ्या टप्प्यातील या तीन घटकांवर एकूण 1,895 कोटी रुपये खर्च येईल , यापैकी  637 कोटी रुपये केंद्राकडून अर्थसहाय्य म्हणून उपलब्ध केले जातील.

ऑफ ग्रिड सौर प्रणालिमुळे ग्रामीण आणि दुर्गम भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

 

 

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 

 



(Release ID: 1534680) Visitor Counter : 64


Read this release in: English