आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

उत्तर प्रदेशात फाफमाऊ, अलाहाबाद येथे गंगा नदीवर 6 पदरी नवीन पूल बांधायला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 06 JUN 2018 6:59PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 6 जून 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अर्थ विषयक केंद्रीय समितीने, राष्ट्रीय महामार्ग-96  वर  उत्तरप्रदेशातील फाफमाऊ , अलाहाबाद येथे गंगा नदीवर  9.9 किमी लांब 6 पदरी नवीन पूल बांधायला मंजुरी दिली आहे. यासाठी 1948.25 कोटी रुपये खर्च येईल.

हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागेल आणि डिसेंबर 2021 पर्यंत तो पूर्ण होण्याची शक्यता आहे. नवीन पुलामुळे अलाहाबादमध्ये एनएच-96 वर सध्या होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर व्हायला मदत होईल.

नवीन पुलामुळे कुंभ, अर्ध कुंभ, प्रयाग इथे होणाऱ्या वार्षिक स्नानादरम्यान अधिकाधिक लोकांना अलाहाबादला पोहचणे सोपे होईल. यामुळे तीर्थस्थळ  पर्यटन आणि प्रयाग शहराच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

तसेच या सहा पदरी पुलामुळे लखनौ /  फ़ैझाबाद या मार्गावर  राष्ट्रीय महामार्ग 27 आणि 76 द्वारे नैनी पुलावरून येणाऱ्या प्रवाशांनां आणि  दळणवळणाला  फायदा होणार आहे.

 

 

 

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 

 



(Release ID: 1534679) Visitor Counter : 64


Read this release in: English