पंतप्रधान कार्यालय

शांग्रीला चर्चेदरम्यान पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 01 JUN 2018 8:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 जून 2018

 

पंतप्रधान ली सिन लुंग ,

तुमची मैत्री, भारत-सिंगापूर भागीदारी आणि या प्रदेशाच्या उत्तम भवितव्यासाठी तुम्ही केलेल्या  नेतृत्वाबद्दल धन्यवाद.

संरक्षण मंत्री,

जॉन चिपमैन,

मान्यवर आणि महामहीम,

तुम्हा सर्वाना नमस्कार, शुभ संध्याकाळ,

प्राचीन काळापासून सुवर्णभूमी म्हणून भारताला परिचित असलेल्या प्रांताला पुन्हा भेट देताना मला आनंद होत आहे.

एका विशेष वर्षात इथे उपस्थित राहतांना मलाही अतिशय आनंद झाला आहे. आसियान बरोबर भारताच्या संबंधांचे हे विशेष वर्ष आहे.

जानेवारी महिन्यात आमच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात 10 आसियान देशांच्या प्रमुखांचे आदरातिथ्य करण्याचा विशेष मान आम्हाला मिळाला. आसियान-भारत शिखर परिषद ही आसियान आणि आमच्या ॲक्ट ईस्ट धोरणाप्रति  आमच्या कटिबध्दतेची साक्ष देते.

हजारो वर्षांपासून भारतीयांचा पूर्वेकडे ओढा आहे, केवळ सूर्योदय पाहण्यासाठी नाही तर संपूर्ण जगभर याचा प्रकाश पसरावा अशी प्रार्थना करण्यासाठी देखील. 21 व्या शतकात संपूर्ण जगासाठी आश्वस्त ठरेल अशा आशेसह मानवजाती आता उगवत्या पूर्वेकडे पाहत आहे. कारण हिंद-प्रशांत क्षेत्रात होत असलेल्या घडामोडींनी जगाचे भवितव्य प्रभावित होणार आहे.

कारण आश्वासनांचे हे नवीन युग देखील जागतिक राजकारणाच्या बदलत्या साच्यात आणि इतिहासाच्या मतभेदांमध्ये अडकले आहे. मी हे सांगायला इथे आलो आहे कि  जे भवितव्य आपल्याला हवे आहे ते शांग्रीलासारखे मायावी नसावे, या प्रांताला आपण आपल्या सामूहिक आशा आणि आकांक्षांनी आकार देऊ शकतो. सिंगापूरशिवाय अन्य दुसऱ्या ठिकाणी करणे हे संयुक्तिक ठरणार नाही. या महान राष्ट्राने आपल्याला दाखवले आहे कि जेव्हा महासागर खुले असतात, समुद्र सुरक्षित असतात, देश एकमेकांशी जोडलेले असतात, कायद्याचे राज्य असते आणि प्रदेशात स्थैर्य असते, देश मग तो कोणताही असो, छोटा किंवा मोठा, सार्वभौम देशाप्रमाणे समृद्ध होतो. त्यांच्या निवडीनुसार मुक्त आणि निर्भय.

सिंगापूरने हे देखील दाखवून दिले आहे की जेव्हा राष्ट्रे अन्य विचारसरणीपेक्षा तत्वांच्या बाजूने उभी राहतात, तेव्हा ते जगाचा आदर आणि आंतरराष्ट्रीय बाबींमध्ये सर्वसहमती संपादन करतात. आणि जेव्हा ते आपल्या भूमीवर विविधतेला आलिंगन देतात, तेव्हा त्यांना बाहेर सर्वसमावेशक विश्व हवे असते.

भारतासाठी सिंगापूर हे महत्वाचे असले, तरी सिंह देश आणि सिंह शहराला एकत्र आणण्यासाठीचा आत्मा म्हणजे भारत आहे. सिंगापूर हा आमच्यासाठी आसियानला जाण्याचा स्प्रिंगबोर्ड आहे. अनेक शतके तो भारतासाठी पूर्वेकडे जाण्याचे प्रवेशद्वार होता. दोन हजार वर्षांहून अधिक काळ मान्सूनचे वारे, समुद्रातील प्रवाह आणि मानवी आकांक्षांच्या शक्तीने भारत आणि या प्रदेशांदरम्यान कालातीत संबंध निर्माण केले आहेत. शांतता आणि मैत्री, धर्म आणि संस्कृती, कला आणि वाणिज्य, भाषा आणि साहित्य यात ते दिसून येतात. राजकारण आणि व्यापाराच्या लाटेतही  हे मानवी संबंध टिकून राहिले आहेत.

गेली तीन दशके आम्ही दावा करत आहोत की या प्रांतात आपली भूमिका आणि संबंध वारसा हक्कासाठी पूर्ववत करेल. यासाठी अन्य कोणताही देश चांगल्या कारणांसाठी सुध्दा स्वत:चे लक्ष वेधून घेत नाही.

पूर्व-वैदिक काळापासून भारतीय विचारसरणीत महासागरांना महत्वाचे स्थान आहे. हजारो वर्षांपूर्वी सिंधू संस्कृती आणि भारतीय द्वीपकल्प यांच्यात सागरी व्यापार होता. महासागर आणि वरुण - सर्व जलांचा राजाने ‘वेद’ या  जगातील सर्वात प्राचीन पुस्तकात महत्वाचे स्थान मिळवले आहे. प्राचीन पुराणात, जे हजारो वर्षांपूर्वी लिहिले गेले, यात भारताची भौगोलिक व्याख्या समुद्राच्या संदर्भात आहे. ‘उत्तरों यत समुद्रस्य’ म्हणजे समुद्राच्या उत्तरेला असलेली भूमी.

माझ्या गुजरातमधील लोथाल हे जगातील सर्वात जुन्या बंदरांपैकी एक आहे. आजही तिथे गोदीचे अवशेष आहेत. गुजराती लोक मेहनती आहेत आणि आजही जगभर प्रवास करतात यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. हिंद महासागराने भारताच्या इतिहासाला आकार दिला आहे. आपले भवितव्य त्याच्या हातात आहे. भारताचा 90 % व्यापार आणि आपले  ऊर्जा स्रोत या महासागरात आहेत. जागतिक व्यापाराची ही जीवनरेखा आहे. वैविध्यपूर्ण संस्कृतीचे प्रदेश  आणि शांतता आणि समृद्धीच्या विविध स्तरांना हिंद महासागर जोडतो. प्रमुख शक्तीची जहाजे इथे आहेत. दोन्ही स्थैर्य आणि स्पर्धेबाबत चिंता निर्माण करतात.

पूर्वेकडे मलाक्का सामुद्रधुनी आणि दक्षिण चीन समुद्र भारताला पॅसिफिकशी आणि आसियान, जपान, कोरिया, चीन आणि अमेरिका या आपल्या प्रमुख  भागीदारांशी जोडतो. या भागातील आपला व्यापार वेगाने वाढत आहे. आपल्या परदेशी गुंतवणुकीचा लक्षणीय प्रवाह याच दिशेने वाहतो. आसियानचा एकट्याचा हिस्सा 20 % पेक्षा अधिक आहे.

या प्रदेशात आमच्या अनेक आवडी आहेत आणि आमचे संबंध दृढ आहेत. हिंद महासागर क्षेत्रात आमचे संबंध अधिक मजबूत होत आहेत. आम्ही आमचे मित्र आणि भागीदारांसाठी आर्थिक क्षमता वाढवायला आणि सागरी सुरक्षा सुधारण्यात मदत करत आहोत. इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियम सारख्या मंचाच्या माध्यमातून आम्ही सामूहिक सुरक्षेला प्रोत्साहन देत आहोत.

हिंद महासागर रिम संघटनेच्या माध्यमातून प्रादेशिक सहकार्याचा व्यापक कार्यक्रम आम्ही सुरु केला आहे. जागतिक सागरी मार्ग शांततापूर्ण आणि सर्वांसाठी मुक्त असावेत यासाठी आम्ही हिंद महासागर क्षेत्राबाहेरील भागीदारांसह काम करत आहोत.

तीन वर्षांपूर्वी आमच्या स्वप्नाचे एका शब्दात मी वर्णन केले होते-सागर, ज्याचा हिंदी मध्ये महासागर असा अर्थ होतो. आणि सागर म्हणजे प्रांतातील सर्वांची सुरक्षा आणि विकास आहे आणि आपल्या ॲक्ट ईस्ट धोरणाच्या माध्यमातून आपण पूर्व आणि ईशान्येकडील भागीदारांना  भारताबरोबर सहभागी होण्याचे आवाहन करत अधिक कठोरपणे याचे पालन करत आहोत.

दक्षिण-पूर्व आशिया हा जमीन आणि समुद्र मार्गाने आपला शेजारी आहे. प्रत्येक दक्षिण-पूर्व आशिया देशाबरोबर आपले वाढते राजकीय, आर्थिक आणि संरक्षण संबंध आहेत. आसियान बरोबर गेल्या 25 वर्षात संवाद भागीदार ते धोरणात्मक भागीदार असा आपण प्रवास केला आहे. वार्षिक शिखर परिषद आणि 30 चर्चा यंत्रणांद्वारे आपण आपले संबंध अधिक दृढ करत आहोत. मात्र त्याहीपेक्षा सामायिक स्वप्न आणि आपल्या जुन्या संबंधाच्या माध्यमातून अधिक प्रयत्न करत आहोत.

पूर्व आशिया शिखर परिषद, ए.डी.एम.एम प्लस आणि ए.आर.एफ यांसारख्या आसियान-प्रणित संस्थांमध्ये आम्ही सक्रिय भागीदार आहोत. बिमस्टेक आणि मेकाँग-गंगा आर्थिक कॉरिडॉर या दक्षिण आणि नैऋत्य आशियामधील पुलाचा आम्ही भाग आहोत.

जपानबरोबर आर्थिक ते धोरणात्मक असे संबंध आमूलाग्र बदलले आहेत. महान उद्देशांची ही भागीदारी भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणाचा कणा आहे. कोरियाबरोबरच्या आमच्या सहकार्यात मजबूत गतिमानता आहे आणि ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड बरोबरच्या भागीदारीत ताजी ऊर्जा आहे.

आमच्या अनेक भागीदारांबरोबर आम्ही तीन किंवा त्याहून अधिक स्वरूपात भेटतो. तीन वर्षांपूर्वी पॅसिफिक आयलंड देशांबरोबर संबंधांचे नवीन यशस्वी टप्पा सुरु करण्यासाठी मी फिजीमध्ये पहाटे दाखल झालो. भारत-पॅसिफिक आयलंड सहकार्य मंचाच्या किंवा एफआयपीआयसीच्या बैठकांनी सामायिक हित आणि कृतीच्या माध्यमातून भौगोलिक अंतर जोडले आहे.

पूर्व आणि आग्नेय आशियाच्या  पलीकडे आमची भागीदारी मजबूत होत असून विस्तारही होत आहे. आमच्या धोरणात्मक स्वायत्ततेमुळे भारताची रशियाबरोबरची धोरणात्मक भागीदारी प्रगल्भ आणि विशेष बनली आहे.

दहा दिवसांपूर्वी सोची इथं अनौपचारिक शिखर परिषदेत सध्याच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्रपती पुतीन आणि मी एका मजबूत बहु-ध्रुवीय व्यवस्थेच्या गरजेवर भर दिला. त्याचवेळी अमेरिकेबरोबरची भारताची जागतिक धोरणात्मक भागीदारी भूतकाळातील संकोच बाजूला सारून अधिक दृढ झाली आहे. बदलत्या जगात त्याला नव्याने महत्व प्राप्त झाले आहे. खुल्या, स्थिर, सुरक्षित आणि समृद्ध हिंद-प्रशांत क्षेत्राबाबत आमचे समान स्वप्न आमच्या या भागीदारीचा महत्वाचा स्तंभ आहे.

भारताचे अन्य कोणत्याही देशाबरोबर एवढे बहुस्तरीय संबंध नाहीत जेवढे चीनबरोबर आहेत. आम्ही जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले आणि वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था असलेले दोन देश आहोत. आमचे सहकार्य विस्तारत आहे. व्यापार वाढत आहे. आणि आम्ही समस्या हाताळताना आणि सीमेवर शांतता राखताना प्रगल्भता आणि चातुर्य दाखवलं आहे. जागतिक शांतता आणि समृद्धीसाठी भारत-चीन दरम्‍यान दृढ आणि स्थिर संबंध महत्वाचे घटक असल्याचे आम्ही मानतो आणि  एप्रिलमध्ये राष्ट्रपती शी यांच्याबरोबर झालेल्या  दोन दिवसीय अनौपचारिक शिखर परिषदेने यावर शिक्कामोर्तब केले. मला विश्वास आहे की भारत आणि चीन जेव्हा परस्पर विश्वासाने आणि एकमेकांच्या हिताचा विचार करून एकत्रितपणे काम करतील, तेव्हा आशिया आणि जगाला उत्तम भवितव्य असेल.

भारताची आफ्रिकेबरोबर भागीदारी वाढत आहे जिला भारत-आफ्रिका मंच शिखर परिषदसारख्या यंत्रणांच्या माध्यमातून चालना मिळते. आफ्रिकेच्या गरजांनुसार सहकार्य आणि सौहार्द आणि परस्पर आदराचा इतिहास याच्या केंद्रस्थानी आहे.

आपल्या प्रांताकडे पुन्हा वळतो, भारताच्या वाढत्या संबंधांना दृढ आर्थिक आणि संरक्षण सहकार्याची देखील साथ आहे. जगाच्या या भागात अन्य कुठल्याही भागापेक्षा आमचे सर्वाधिक व्यापार करार आहेत. सिंगापूर, जपान आणि दक्षिण कोरियाबरोबर आमचे व्यापक आर्थिक भागीदारी करार आहेत. आसियान आणि थायलंड बरोबर आमचे मुक्त व्यापार करार आहेत. प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी करार संपुष्टात आणण्यात आता आम्ही सक्रिय पणे सहभागी आहोत. नुकतीच इंडोनेशियाला मी पहिल्यांदा भेट दिली. 90 सागरी मैल  अंतरावर जवळच असलेला भारताचा शेजारी .

माझे मित्र राष्ट्रपती विदोदो आणि मी भारत-इंडोनेशिया संबंध व्यापक धोरणात्मक भागीदारीपर्यंत उंचावले आहेत. अन्य सामायिक बाबींमध्ये हिंद-प्रशांत क्षेत्रात सागरी सहकार्य हे आमचे समान स्वप्न आहे. इंडोनेशियाहून जाताना मी मलेशिया इथे आसियानच्या सर्वात वरिष्ठ नेत्यांपैकी एक असलेले पंतप्रधान महाथिर यांना भेटण्यासाठी थोडा वेळ थांबलो होतो.

मित्रांनो,

भारतीय सशस्त्र दल, विशेषतः आमचे नौदल, हिंद-प्रशांत क्षेत्रात शांतता आणि सुरक्षा नांदावी यासाठी तसेच मानवतेच्या दृष्टिकोनातून  आणि आपत्तीच्या काळात मदत करत आहे. संपूर्ण प्रांतात ते प्रशिक्षण, सराव करत असून सदिच्छा मोहिमा देखील आयोजित करत आहेत. उदा. सिंगापूरबरोबर आम्ही गेली 25 वर्षे अखंड नौदल सराव करत आहोत.

लवकरच आम्ही सिंगापूरबरोबर एक नवीन त्रिस्तरीय सराव सुरु करणार आहोत आणि अन्य आसियान देशांबरोबर देखील असा कार्यक्रम लवकरच सुरु होण्याची आम्हाला आशा आहे. परस्परांच्या क्षमता वाढवण्यासाठी आम्ही व्हिएतनाम सारख्या भागीदारांबरोबर काम करत आहोत. भारत अमेरिका आणि जपानबरोबर मलबार सरावाचे आयोजन करतो. हिंद महासागरातील मिलन आणि प्रशांत महासागरातील रिम्पॅक या भारताच्या सरावात अनेक प्रादेशिक भागीदार भारताबरोबर सहभागी होत आहेत.

आशिया खंडातील विविध शहरात जहाजांवर होणारे सशस्त्र हल्ले आणि चाचेगिरी रोखण्यासाठी प्रादेशिक सहकार्य करारात आम्ही सक्रिय आहोत. श्रोत्यांमधील मान्यवर सदस्यांनो , 2022 पर्यंत म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होतील , तोपर्यंत भारताचे नवीन भारतात परिवर्तन करण्याचे आमचे मुख्य अभियान आहे.

आम्ही साडेसात ते आठ टक्के विकासदर कायम राखू. आमची अर्थव्यवस्था वाढेल तसे आमचे जागतिक आणि प्रादेशिक एकात्मीकरण वाढेल. 80 कोटींहून अधिक युवक असलेल्या देशाला माहित आहे की त्यांचे भवितव्य केवळ देशाच्या अर्थव्यवस्थेच्या आकाराने नव्हे तर जागतिक संबंधांमुळेही सुरक्षित आहे. अन्य कुठल्याही भागापेक्षा या प्रांतात आपले संबंध अधिक दृढ होतील आणि आपले अस्तित्व वाढेल. मात्र आपल्याला जे भविष्य निर्माण करायचे आहे त्यासाठी शांततेचा मजबूत पाया आवश्यक आहे आणि ते अजून खूप दूर आहे.

जागतिक शक्ती बदलली आहे, जागतिक अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलला आहे आणि तंत्रज्ञानांत दररोज अडथळे निर्माण होत आहेत. जागतिक स्थितीचा पाया कोलमडलेला दिसत आहे आणि भवितव्य अनिश्चित दिसत आहे. आपल्या संपूर्ण प्रगतीसाठी आपण अनिश्चिततेच्या काठावर आणि निराकरण न झालेले तंटे, स्पर्धा आणि दावे, स्वप्नांचा  संघर्ष या स्थितीत  जगत आहोत.

वाढती परस्पर असुरक्षितता आणि वाढता लष्करी खर्च, अंतर्गत ठिकाणांचे बाह्य तणावात होणारे रूपांतर आणि व्यापार आणि स्पर्धांमधील नवीन सदोष मार्ग आपल्याला दिसत आहेत. त्याहीपेक्षा आंतरराष्ट्रीय निकषांवर असलेल्या सामर्थ्याचा दावा आपण पाहत आहोत. या सगळ्यामध्ये आपण सर्वाना सामोरे जावे लागणारी आव्हाने आहेत ज्यात दहशतवाद आणि अतिरेकवादाचा समावेश आहे. एकमेकांचे नशीब आणि अपयशाचे हे जग आहे. आणि कोणताही देश त्याला आकार देऊ शकत नाही किंवा संरक्षण करू शकत नाही.

हे असे जग आहे जे आपल्याला विभाजन आणि स्पर्धा झुगारून एकत्रितपणे काम करण्यासाठी पाचारण करत आहे. हे शक्य आहे का?

हो, हे शक्य आहे. मी असियानकडे एक उदाहरण आणि प्रेरणा म्हणून पाहतो. जगातील कोणत्याही समूहाच्या सांस्कृतिक, धर्म, भाषा, शासन आणि समृद्धीच्या विविधतेच्या  स्तराचे  आसियान प्रतिनिधित्व करतो.

याचा जन्म तेव्हा झाला जेव्हा आग्नेय आशिया जागतिक स्पर्धेच्या आघाडीत होती. एका क्रूर युद्धाचे रणांगण आणि अनिश्चित राष्ट्रांचे क्षेत्र होते. मात्र तरीही आज आसियानने एका समान उद्देशाने 10 देशांना एकत्र आणले आहे. आसियानची एकजूट या क्षेत्राच्या स्थिर भवितव्यासाठी आवश्यक आहे.

आणि आपण प्रत्येकाने याला पाठिंबा द्यायला हवा, त्याचे खच्चीकरण करायचे नाही. मी चार पूर्व आशिया शिखर परिषदांमध्ये सहभागी झालो आहे. मला खात्री आहे की आसियान व्यापक क्षेत्राला एकत्र आणेल. अनेक प्रकारे आसियान आधीपासूनच या प्रक्रियेचे नेतृत्व करत आहे. असे करताना त्यांनी हिंद-प्रशांत क्षेत्राचा पाया रचला आहे. पूर्व आशिया शिखर परिषद आणि प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी – हे आसियानचे दोन महत्वपूर्ण उपक्रम- हा  भूगोल जवळ करूया.

मित्रांनो,

हिंद-प्रशांत क्षेत्र हे नैसर्गिक क्षेत्र आहे. जागतिक संधी आणि आव्हानाच्या भव्य श्रुंखलेचेही हे घर आहे. दिवसागणिक मला खात्री वाटत आहे की या क्षेत्रात राहणाऱ्या आपल्या लोकांचे नशीब एकमेकांशी जोडलेले आहे. आज आपल्याला एकत्रितपणे काम करण्यासाठी विभाजन आणि स्पर्धा झुगारून देण्याचे आवाहन केले जात आहे.

आग्नेय आशियाचे दहा देश भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या दोन महासागरांना जोडतात. समावेशकता, खुलेपणा आणि आसियान केन्द्रीयता आणि एकता नवीन हिंद-प्रशांत क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहेत. भारत हिंद-प्रशांत क्षेत्राला एक रणनीती म्हणून किंवा मर्यादित सदस्यांचा क्लब म्हणून पाहत नाही .

आणि वर्चस्व गाजवणारा एक समूह म्हणूनही पाहत नाही आणि कोणत्याही प्रकारे आम्ही हे कुठल्याही देशाच्या विरोधात मानत नाही. अशी भौगोलिक व्याख्या होऊ शकत नाही. भारत-प्रशांत क्षेत्रासाठी भारताचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. आणि त्यात अनेक घटक आहेत.

एक,

एका मुक्त , खुल्या, सर्वसमावेशक क्षेत्राला याचे समर्थन आहे जे आपणा सर्वांना प्रगती आणि समृद्धीच्या एका सामान्य शोधात सामावून घेते. यात या भूगोलातील सर्व देश आणि बाहेरील देश ज्यांचा यात वाटा आहे ते देखील समाविष्ट आहेत.

दोन,

आग्नेय आशिया याच्या केंद्रस्थानी आहे. आणि आसियान, याच्या भविष्याच्या केंद्रस्थानी असेल. हा दृष्टिकोन भारताला नेहमी मार्गदर्शन करेल, कारण आपल्याला या क्षेत्रात शांतता आणि सुरक्षा नांदावी यासाठी सहकार्य करायचे आहे.

तीन,

आमचे असे मत आहे की आपल्या सामायिक समृद्धी आणि सुरक्षेसाठी आपण या क्षेत्रासाठी चर्चेच्या माध्यमातून एक सामान्य नियम आधारित व्यवस्था विकसित करण्याची आवश्यकता आहे. सर्वाना वैयक्तिकरित्या आणि जागतिक दृष्ट्या हे समप्रमाणात लागू राहील. अशा प्रकारच्या  व्यवस्थेचा आकार आणि सामर्थ्य यांचा विचार न करता सार्वभौमत्व आणि प्रांतीय अखंडता तसेच सर्व देशांच्या समानतेवर विश्वास असायला हवा. केवळ काही शक्तीनुसार नाही तर सर्वांच्या सहमतीवर हे, नियम आणि निकष आधारित असायला हवेत. ते चर्चेवरील विश्वासावर आधारित असायला हवेत, दबावावर अवलंबून असता कामा नयेत. याचा असाही अर्थ आहे की जेव्हा देश आंतरराष्ट्रीय स्तरावर कटिबद्ध असल्याचे सांगतात, तेव्हा त्यांनी त्याचे पालन करायला हवे. बहुपक्षवाद आणि प्रांतीयवादावरील भारताच्या विश्वासाचा हा पाया आहे.

चार,

आंतरराष्ट्रीय कायद्याअंतर्गत आपणा सर्वांना, समुद्र आणि आकाशातील समान जागेच्या वापराबाबत समान अधिकार असायला हवा. यासाठी दिशादर्शकाचे स्वातंत्र्य, अप्रतिबंधित वाणिज्य, आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार शांततापूर्ण मार्गाने तंटा निवारण गरजेचे आहे. जेव्हा आपण सर्व अशा पद्धतीने जगणे मान्य करू, तेव्हा आपले समुद्र मार्ग समृद्धी आणि शांततेचे मार्ग बनतील. आपण सागरी गुन्हे रोखण्यासाठी, सागरी परिसंस्थेचे जतन करण्यासाठी, आपत्तीपासून वाचण्यासाठी आणि नील अर्थव्यवस्थेद्वारे समृद्ध होण्यासाठी एकत्र येऊ शकू.

पाच,   

हे क्षेत्र आणि आपणा सर्वाना जागतिकीकरणातून लाभ झाला आहे. भारतीय जेवण हे या लाभाच्या सर्वोत्तम उदाहरणांपैकी एक आहे. मात्र वस्तू आणि सेवांमध्ये संरक्षणवाद वाढत आहे. संरक्षणाच्या भिंतीमागे तोडगा सापडणार नाही, तर बदल स्वीकारल्यास तोडगा सापडेल. आपल्याला सर्वांसाठी समान संधी हवी आहे. भारत खुली आणि स्थिर आंतरराष्ट्रीय व्यापार पद्धतीच्या बाजूने उभा आहे. आम्ही हिंद-प्रशांत क्षेत्रात नियम-आधारित, खुली, संतुलित आणि स्थिर व्यापार वातावरणाला पाठिंबा देऊ जे सर्व देशाना व्यापार आणि गुंतवणुकीच्या लाटेवर स्वार करेल. प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारीकडून आमची हीच अपेक्षा आहे. आरसीईपी नावाप्रमाणे आणि जाहीर तत्वाप्रमाणे व्यापक असायला हवे. व्यापार, गुंतवणूक आणि सेवा यात समतोल असायला हवा.

सहा,

संपर्क महत्वाचा आहे. व्यापार आणि समृद्धी वाढवण्यापेक्षा हे अधिक आहे. हे एका क्षेत्राला एकत्र आणते. शतकानुशतके भारत उंबरठ्यावर उभा आहे. आपण संपर्काचे लाभ जाणतो. या क्षेत्रात संपर्काचे अनेक उपक्रम आहेत. जर ते यशस्वी व्हायला हवे असतील तर आपल्याला केवळ पायाभूत सुविधा उभारून चालणार नाही तर विश्वासाचा पूल देखील बांधायला लागेल. आणि त्यासाठी हे उपक्रम सार्वभौमत्व आणि प्रांतीय अखंडता, सल्लामसलत, सुशासन, पारदर्शकता, व्यवहार्यता, आणि शाश्वतते प्रति विश्वासावर आधारित असायला हवेत. त्यांनी देशांना सक्षम करायला हवे, त्यांना कर्जाच्या बोजाखाली ठेवू नये. त्यानी व्यापाराला चालना द्यायला हवी, धोरणात्मक स्पर्धेला नाही.या तत्वानुसार आम्ही प्रत्येकाबरोबर काम करायला तयार आहोत. भारत दक्षिण आशियात जपान, हिंद महासागरात, आग्नेय आशियात, आफ्रिका, पश्चिम आशिया आणि त्यापलीकडे भागीदारीद्वारे आपले कर्तव्य बजावत आहे. न्यू डेव्हलपमेंट बँक आणि आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेत आम्ही महत्वपूर्ण भागीदार आहोत.

शेवटी,

आपण जर महान सामर्थ्यवान शत्रुत्वाच्या युगात परत गेलो नाही जसे मी याआधी म्हटले होते, तर हे सगळे शक्य आहे.शत्रुत्वाचा आशिया आपणा सर्वांना एकत्र आणेल. सहकार्याचा आशिया या शतकाला आकार देईल. म्हणून, प्रत्येक देशाने स्वतःला विचारायला हवे : याचे पर्याय अधिक एकजूट भारत निर्माण करत आहे की नवीन विभाजन करण्यास प्रवृत्त करत आहे ? विद्यमान आणि उभरत्या महासत्तेची ही जबाबदारी आहे. स्पर्धा सामान्य आहे. मात्र, स्पर्धेचे संघर्षात  रूपांतर होऊ नये. मतभेद भांडणे बनू नयेत. इथे उपस्थित मान्यवर सदस्यांनो, सामायिक मूल्ये आणि हिताच्या आधारे भागीदारी करणे सामान्य बाब आहे. भारताचीही या क्षेत्रात आणि त्या पलिकडे  भागीदारी आहे.

एका स्थिर आणि शांततापूर्ण क्षेत्रासाठी वैयक्तिक रित्या किंवा तीन किंवा त्यापेक्षा अधिक स्वरूपात आम्ही त्यांच्याबरोबर काम करू. मात्र आमची मैत्री नियंत्रणाची आघाडी नाही. आम्ही तत्वे आणि मूल्ये, शांतता आणि प्रगतीच्या बाजूची निवड करतो, विभाजनाची नाही. जगभरातील आमचे संबंध आमच्या स्थितीबाबत बोलतात.

आणि जेव्हा आम्ही एकत्रितपणे काम करू, आम्ही आमच्या काळातील वास्तववादी आव्हानांचा सामना करू शकू. आपण आपल्या पृथ्वीचे संरक्षण करू शकू. आपण अपप्रसार सुनिश्चित करण्यात सक्षम होऊ. आपण आपल्या जनतेला दहशतवाद आणि सायबर धोक्यांपासून सुरक्षित ठेवू शकू.

सरतेशेवटी मी इतकंच सांगेन की भारताची हिंद-प्रशांत क्षेत्रात स्वतःची भागीदारी - आफ्रिकेच्या किनाऱ्यापासून अमेरिकेपर्यंत सर्वसमावेशक असेल. आम्ही वेदांत तत्वज्ञानाचे वारसदार आहोत, जे सर्वांच्या एकत्रितपणावर विश्वास ठेवतात आणि विविधतेत एकता साजरी करतात. एकम सत्यम, विप्रह बहुदावंदांती (सत्य एक आहे अनेक प्रकारे ते शिकता येते) आपल्या सांस्कृतिक नीतिमूल्यांचा - बहुलतावाद , सह-अस्तित्व, खुलेपणा, आणि चर्चा यांचा हा आधार आहे. लोकशाहीची मूल्ये जी आपल्याला राष्ट्र म्हणून परिभाषित करतात , त्याचप्रमाणे आपण जगाला सामावून घेण्याच्या पद्धतीला आकार देतो.

म्हणूनच हे हिंदीत पाच एस मध्ये अनुवादित केले आहेत: सम्मान(आदर), संवाद (चर्चा), सहयोग (सहकार्य), शांती(शांतता) आणि समृद्धी(समृद्धी). हे शब्द शिकणे सोपे आहे. म्हणूनच, आपण आंतरराष्ट्रीय कायद्याप्रति पूर्ण कटिबद्ध राहून चर्चेच्या माध्यमातून आदराने शांततापूर्ण मार्गाने जगाशी संबंध ठेवू शकू.

आपण लोकशाही आणि नियम-आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला प्रोत्साहन देऊ, ज्यात सर्व देश, लहान आणि मोठे, समान आणि सार्वभौम म्हणून पुढे जातील. आपण आपले समुद्र, अंतराळ आणि हवाई मार्ग मुक्त आणि खुले ठेवण्यासाठी इतरांबरोबर काम करू, आपले देश दहशतवादापासून सुरक्षित आहेत आणि आपले सायबर विश्व अडथळे आणि संघर्षापासून मुक्त आहे. आपण आपली अर्थव्यवस्था खुली ठेवू आणि आपले संबंध पारदर्शक असतील. आपण आपले मित्र आणि भागीदार याना  आपली संसाधने, बाजरपेठा आणि समृद्धीबाबत माहिती देऊ. फ्रान्स आणि अन्य भागीदारांबरोबर मिळून नवीन आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या माध्यमातून आपण आपल्या पृथ्वीला शाश्वत भवितव्य प्रदान करू.

अशा प्रकारे या विशाल प्रांतात आणि त्याही पलिकडे आपण आणि आपल्या भागीदारानी मार्गक्रमण करावे अशी आमची इच्छा आहे. या क्षेत्रातलं प्राचीन ज्ञान आमचा सामायिक वारसा आहे. भगवान बुद्धाचा शांतता आणि सहिष्णुतेचा संदेश आपणा सर्वांना एकत्र जोडतो. एकत्रितपणे आपण आपल्या मानवी संस्कृतीला मोठे योगदान दिले आहे. आपण युद्धाचा विनाश आणि शांततेच्या आशेतून गेलो आहोत. आपण शक्तीची मर्यादा पाहिली आहे आणि आपण सहकार्याची फळे देखील पाहिली आहेत.

हे जग एका चौरस्त्यावर आहे जिथे इतिहासाच्या वाईट धड्यांचे प्रलोभन आहे. मात्र तिथे ज्ञानाचा मार्ग देखील आहे. तो आपल्याला उच्च उद्देशाकडे नेतो : आपल्या आवडीच्या संकुचित दृष्टिकोनातून बाहेर पडण्यासाठी आणि हे जाणून घेण्यासाठी की जेव्हा आपण सगळे एकत्र एकसमान म्हणून काम करतो तेव्हा आपण आपले हित उत्तम प्रकारे पूर्ण करू शकतो. मी सर्वाना तो मार्ग स्वीकारण्याचे आवाहन करतो.

धन्यवाद

खूप-खूप धन्यवाद.

 

 

 

B.Gokhale/S.Patil/D.Rane



(Release ID: 1534622) Visitor Counter : 200


Read this release in: English