पंतप्रधान कार्यालय

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित वैश्विक समारंभाला पंतप्रधान संबोधित करणार

Posted On: 04 JUN 2018 8:25PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 4 जून 2018

 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित एका वैश्विक समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. राजपथ लॉन येथे आयोजित एका प्रदर्शनाला पंतप्रधान भेट देणार आहेत.

‘बीट प्लास्टीक पोल्यूशन्स’ अर्थात प्लास्टीकमुळे होणाऱ्या प्रदूषणाला समाप्त करू या, अशी यावर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना आहे. या 43 व्या जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानत्व भारताकडे आहे. नवी दिल्लीत होणाऱ्या या विशेष समारंभात पर्यावरण मंत्री, संयुक्त राष्ट्राचे प्रतिनिधी, विविध औद्योगिक एककांचे सदस्य आणि इतर अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत.

जागतिक पर्यावरण दिन समारंभाचे यजमानत्व भारताकडे असणे हे वातावरणातील बदलांशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्याप्रती भारताच्या आग्रही भूमिकेचे प्रतीक आहे, असे पंतप्रधानांनी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 44व्या भागात सांगितले होते.

 

S.Tupe/M.Pange/P.Kor



(Release ID: 1534362) Visitor Counter : 82


Read this release in: English