गृह मंत्रालय
एफसीआरए अंतर्गत परदेशातून मिळणाऱ्या देणगीवर देखरेख ठेवणाऱ्या ऑनलाईन विश्लेषणात्मक प्रणालीचा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते शुभारंभ
प्रविष्टि तिथि:
01 JUN 2018 4:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जून 2018
एफसीआर अर्थात परदेशात देणी नियमन कायदा 2010 अंतर्गत, नोंदणीकृत विविध संस्थांना मिळणाऱ्या परदेशी देणगीचा ओघ आणि वापरावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी ऑनलाईन विश्लेषणात्मक प्रणालीचा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज शुभारंभ केला. या वेब आधारित साधनामुळे सरकारच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांना परदेशी निधीचा स्रोत आणि भारतातील त्याचा प्रत्यक्ष वापर याची पडताळणी करणे शक्य होणार आहे. याचा डॅशबोर्ड एफसीआरएच्या नोंदणीकृत संस्थांच्या बँक खात्यांशी जोडण्यात येणार आहे.
N.Sapre/S.Kane/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1534090)
आगंतुक पटल : 120
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English