पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांच्या हस्ते पूर्व परीघ महामार्ग आणि दिल्ली-मेरठ महामार्गाचे उद्‌घाटन

Posted On: 27 MAY 2018 7:58PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 27 मे 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली एनसीआर विभागातील नव्याने उभारलेले दोन महामार्ग राष्ट्राला समर्पित केले. या महामार्गांमध्ये 14 मार्गिकांच्या दिल्ली-मेरठ महामार्गाच्या निझामुद्दीन पूल ते दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचा समावेश होता. राष्ट्रीय महामार्ग 1 वरील कुंडली ते राष्ट्रीय महामार्ग 2 वरील पलवाला दरम्यानच्या 135 कि.मी. लांबीच्या पूर्व परीघ महामार्ग प्रकल्पही राष्ट्राला समर्पित करण्यात आला.

दिल्ली-मेरठ महामार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर दिल्ली ते मेरठ तसेच पश्चिम उत्तर प्रदेशाचा काही भाग आणि उत्तराखंड दरम्यानच्या प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होईल.

दिल्ली-मेरठ महामार्गाच्या उद्‌घाटनानंतर महामार्गावरुन उघड्या जीपमधून प्रवास करणाऱ्या पंतप्रधान मोदींचे या नव्या महामार्गाजवळ लोकांनी स्वागत केले.

पूर्व परीघ महामार्गामुळे दिल्लीकडे येण्याची गरज नसलेली वाहतूक वेळ व स्थान राष्ट्रीय राजधानीमधील वाहतूक कोंडी कमी होईल तसेच प्रदूषणही कमी होईल.

संपूर्ण दिल्ली-मेरठ महामार्गाचे काम लवकरच पूर्ण होईल असा विश्वास पंतप्रधानांनी बागपत येथे जाहीर सभेत बोलतांना व्यक्त केला. दिल्लीच्या परीघावरील या पूर्व महामार्गामुळे दिल्लीतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले. लोकांचे जीवनमान उंचावण्यात आधुनिक पायाभूत सुविधांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. रस्ते, रेल्वे, जलमार्ग इत्यादी पायाभूत सुविधा बांधण्यासाठी उचलण्यात येणाऱ्या पावलांचा त्यांनी उल्लेख केला. पायाभूत विकासाच्या वाढत्या वेगाबद्दल त्यांनी उदाहरणंही दिली.

महिला सक्षमीकरणाबद्दल बोलतांना पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत बांधण्यात आलेली शौचालये आणि उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या स्वयंपाकाच्या गॅस जोडण्या यामुळे महिलांचे आयुष्य सोपं झाल्याचे सांगितले. मुद्रा योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या 13 कोटी कर्जांपैकी 75 टक्क्यांहून अधिक कर्ज महिला उद्योजिकांना देण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी उचलण्यात आलेल्या पावलांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला.

यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात ग्रामीण आणि कृषी पायाभूत सुविधा मजबुतीकरणासाठी 14 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही पंतप्रधान म्हणाले.

 

B.Gokhale/J.Patankar/P.Kor



(Release ID: 1533644) Visitor Counter : 105


Read this release in: English