केंद्रीय लोकसेवा आयोग

नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2018

प्रविष्टि तिथि: 25 MAY 2018 2:37PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली,  25 मे 2018

 

केंद्रीय लोक सेवा आयोगातर्फे येत्या 3 जून रोजी (रविवारी) देशभरात नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2018 घेतली जाणार आहे. आतापर्यंत परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरून आपापली प्रवेशपत्रे प्राप्त केली आहेत. उर्वरित उमेदवारांनी लवकरात लवकर आपली प्रवेशपत्रे डाऊनलोड करावीत, असे आयोगाने सूचित केले आहे.

सर्व उमेदवारांनी या परीक्षेच्या निर्धारित वेळेच्या 10 मिनिटे आधीच परिक्षास्थळी प्रवेश करावा. (सकाळच्या सत्रात 9 वा. 20 मि. आणि दुपारच्या सत्रात 2 वा. 20 मि.) त्यानंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जाईल.

प्रवेश पत्रावर नमूद केलेल्या ठिकाणीच उमेदवारांना परीक्षा देता येईल, असेही आयोगाने सूचित केले आहे.

 

B.Gokhale/M.Pange/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1533481) आगंतुक पटल : 146
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English