कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
गैरव्यवहार तपासण्यासाठी प्रतिबंधात्मक दक्षतेचे सीव्हीसीचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
24 MAY 2018 4:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मे 2018
गैरव्यवहार तपासण्यासाठी प्रतिबंधात्मक दक्षतेचा अवलंब करावा असे आवाहन केंद्रीय दक्षता आयुक्त के. व्ही. चौधरी यांनी केले. ‘प्रतिबंधात्ऱ्मक दक्षता-चांगल्या पद्धतींचा प्रसार’ या कार्यशाळेचे उद्घाटन करताना ते आज नवी दिल्ली येथे बोलत होते. संवेदनशील सुधारणा आणि संरचनात्मक उपायांद्वारे हे साध्य होऊ शकते. या उपाययोजनांमुळे भ्रष्ट पद्धतींना आळा बसेल आणि संघटनात्मक कार्यक्षमता वाढविण्याचा उद्देश पूर्ण होईल असे ते म्हणाले.
माल आणि सेवांची खरेदी-विक्री, मनुष्यबळ व्यवस्थापन, नागरिकांना सेवा पुरवणे आणि या क्षेत्रात मुख्यत: गैरव्यवहार जास्त प्रमाणात आढळून येतील. या सर्वांना आळा बसवण्यासाठी सध्या सुरू असलेल्या व्यवस्थेत सुधारणा करणे गरजेचे आहे असे चौधरी म्हणाले.
B.Gokhale/S.Mhatre/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1533355)
आगंतुक पटल : 89
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English