आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

पारादीप पोर्ट ट्रस्ट ला दिलेल्या सरकारी कर्जावरच्या दंडात्मक व्याजाला माफी देण्याला केंद्रीय मंत्री मंडळाची मंजुरी

Posted On: 23 MAY 2018 6:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 मे 2018

 

पारादीप पोर्ट ट्रस्ट ला दिलेल्या सरकारी कर्जावरच्या दंडात्मक व्याजाला माफी देण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या  केंद्रीय मंत्री मंडळाच्या अर्थविषयक समितीच्या आज झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

31.03.2017 रोजी पारादीप पोर्ट  ट्रस्टला सुमारे 1076.59 कोटी रुपयांचे दंडात्मक व्याज माफ आणि माफीच्या मंजुरीच्या तारखेपर्यंतच्या वाढत्या रकमेला माफी 

दंडात्मक व्याजाच्या  माफीच्या मंजुरीच्या तारखेपर्यंत,पारादीप पोर्ट ट्रस्ट, 0.25% दराने दंडात्मक व्याज  चुकते  करेल. 

 माफीच्या मंजुरीच्या तारखेपर्यंत, पारादीप पोर्ट ट्रस्ट 387.74 कोटी रुपयाची मूळ रक्कम आणि  व्याजाची रक्कम परतफेडीला सुरवात करेल. 2018 -19 आणि 2019 -20 मधे दोन हप्त्यात ही परतफेड करायची आहे.

 

पूर्वपीठीका:

 पारादीप पोर्ट ट्रस्टने 1967 ते 2002 या काळात आपल्या पायाभूत प्रकल्पांसाठी 642.69 कोटी रुपयाचे  कर्ज घेतले होते. पाच वर्षाच्या सवलतीच्या काळासह 20 वार्षिक हप्त्यात हे कर्ज फेडायचे होते. मात्र पारादीप पोर्ट ट्रस्ट 1987 -88 पर्यंत तोट्यात होते आणि मह्सुलात तुट होती,त्यामुळेकर्ज फेड शक्य झाली नाही. परिणामी  पारादीपचा कर्जाचा बोजा 1743.69 कोटी रुपयांचा झाला.

याशिवाय पोर्ट ट्रस्टला विविध आगामी विकास प्रकल्पांसाठी आणि कर्मचाऱ्यांचे  निवृत्ती वेतन देण्यासाठी सुमारे 6695 कोटी रुपयाची गरज भासत होती. त्यामुळे 1743.69 कोटीचे एकूण कर्ज फेडण्याच्या स्थितीत पोर्ट ट्रस्ट नाही.

 

 

 

B.Gokhale/N.Chitale/D.Rane

 



(Release ID: 1533215) Visitor Counter : 46


Read this release in: English