मंत्रिमंडळ

ईशान्य प्रदेशासाठी सीटीडीपी अंतर्गत मेघालयमध्ये मोबाईल सेवांच्या तरतुदीसाठी युएसओएफ योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 23 MAY 2018 6:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 मे 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने  अंदाजे 3911 कोटी रुपये खर्च करून मेघालयमध्ये ईशान्य प्रदेशासाठी व्यापक दूरसंचार विकास योजनेची  (सीटीडीपी) अंमलबजावणी करायला तसेच या योजनेच्या 8120.81 कोटी रुपये वाढीव खर्चाला मंत्रिमंडळाने 5336.18 कोटी रुपये खर्चाला 10.09.2014 रोजीच मंजूरी दिली होती मंजुरी दिली आहे. युनिव्हर्सल सर्विस ऑब्लिगेशन फंड (युएसओएफ) या योजनेसाठी निधी पुरवणार आहे.

 

ठळक वैशिष्ट्ये :

  1. या योजनेत मेघालय राज्यातील जिथे मोबाईल सेवा नाही अशा निवडक क्षेत्रात 2G+4G मोबाईल सेवा पुरवण्याची तरतूद
  2. मेघालयमधील राष्ट्रीय महामार्गांवर विना अडथळा 2G+4G मोबाईल सेवा पुरवण्याची तरतूद

 

लाभ:

  1. दूरसंचार जाळे मजबूत बनविल्याने मेघालयामध्ये मोबाईल संपर्काचा प्रसार वाढेल. यामुळे लोकांना किफायतशीर आणि समप्रमाणात संचार, माहिती आणि प्रशासन सुविधा उपलब्ध होईल.
  2. सार्वजनिक मोबाईल जाळे पोहोचले नसलेल्या भागात मोबाईल सेवा पुरवल्यामुळे तिथल्या नागरिकांना सामाजिक-आर्थिक विकास वाढवण्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञानाचा लाभ मिळेल. 
  3. मोबाईल जाळे नसलेल्या भागात ब्रॉडबँड आणि इंटरनेटच्या माध्यमातून सेवा पुरवली जाईल.

 

 

 

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 



(Release ID: 1533200) Visitor Counter : 139


Read this release in: English