मंत्रिमंडळ

तुर्की मधून जलद आणि पारदर्शी प्रक्रियेने खसखस आयातीकरिता या व्यापारासाठीच्या भारत आणि तुर्की यांच्यातल्या सामंजस्य कराराला मंत्री मंडळाची मान्यता

Posted On: 23 MAY 2018 5:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 मे 2018

 

तुर्की मधून जलद आणि पारदर्शी प्रक्रियेने खसखस आयातीकरिता भारत आणि तुर्की यांच्यातल्या खसखस व्यापारासाठीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्याला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

तपशील-

  1. तुर्कीमधून खसखस भारतात आणण्यासाठी तुर्की अन्नधान्य मंडळ ऑनलाईन पद्धतीचा वापर करून नियमन करेल. या ऑनलाईन यंत्रणेचा सदस्य होण्यासाठी, निर्यातदार कंपन्या एजिअन एक्सपोर्टर असोसिएशन द्वारे आपला अर्ज तुर्की अन्नधान्य मंडळाला  सादर करतील.
  2. दरवर्षी तुर्कीहून भारतात किती खसखस आणायची याचा निर्णय भारत सरकार, तुर्की सरकारशी सल्लामसलत करून घेईल. यासाठी तुर्की मधले खसखस पिकाचे उत्पादन, आधीच्या वर्षीचे शिल्लक पिक आणि त्या देशाच्या निर्यात विषयक इतर बाबी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जाईल.  
  3. निर्यातदार कंपन्या, तुर्की अन्नधान्य मंडळा कडे नोंदणी करतील.
  4. केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण ब्युरो, तुर्की अन्नधान्य मंडळाकडून नोंदणी झालेल्या विक्री कराराची नोंदणी करेल. या कराराचा तपशील, केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो, ऑनलाईन  यंत्रणेवर अपलोड करेल.
  5. तुर्की अन्नधान्य मंडळ, विक्री करारासह इतर प्रक्रीये बरोबरच खसखस उत्पादनासाठीचे  कायदेशीर प्रमाणपत्रही सादर करेल.

या सामंजस्य करारामुळे तुर्की हून खसखस जलदगतीने आणि पारदर्शी पद्धतीने आयात करण्यासाठी मदत होणार आहे. आयात कराराच्या  सत्यतेची खातरजमा यामुळे वेगाने करता येणार आहे. त्याचबरोबर दाव्यांमुळे आयातीला होणारा विलंब टाळता येणार आहे.

 या सामंजस्य करारामुळे भारतातल्या बाजारपेठेत पुरेशी खसखस उपलब्ध राहणार आहे त्यामुळे खसखस ग्राहकांना हे फायदेशीर ठरणार आहे.

 

पूर्वपीठीका :

खटले आणि दाव्यांमुळे, तुर्कीहून खसखस आयात रोखण्यात आली होती त्यामुळे भारतात खसखस दरात मोठी वाढ झाली होती. त्याचबरोबर काही आयात दारांकडून  साठेबाजीही होत होती. हे टाळण्यासाठी सामंजस्य करारामार्गे पर्यायी यंत्रणा गरजेची बनली होती.

 

 

 

B.Gokhale/N.Chitale/D.Rane

 

 



(Release ID: 1533182) Visitor Counter : 109


Read this release in: English