मंत्रिमंडळ

वामपंथी अतिरेक्यांच्या क्षेत्रात मोबाईल जोडणी देण्याच्या तरतुदीला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 23 MAY 2018 5:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 मे 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पासाठी 10 राज्यांमधील 96 जिल्ह्यांच्या वामपंथी दहशतवाद प्रभावित क्षेत्रात गृह मंत्रालयाने निवडलेल्या 4072 टॉवर्सच्या ठिकाणी मोबाईल सेवा पुरवण्यासाठी "युनिव्हर्सल सर्विस ऑब्लिगेशन फंड" सहाय्य  योजनेला मंजुरी दिली आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा एकूण खर्च 7,330 कोटी रुपये इतका असेल.

या नेटवर्कचा वापर वामपंथी दहशतवाद प्रभावित भागात तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून केला जाईल. हा प्रकल्प संपर्क रहित गावातील नागरिकांना मदत करण्यासाठी मोबाईल सेवा पुरवेल. यामुळे या भागात आर्थिक घडामोडींमध्ये सुधारणा होईल. डिजिटल मोबाईल जोडणी उपलब्ध करून देण्याबरोबरच मागास आणि वामपंथी दहशतवाद प्रभावित भागात ई -प्रशासन घडामोडींना चालना मिळेल.

10 राज्यांमधील प्रस्तावित टॉवर्सची ठिकाणे पुढीलप्रमाणे:

क्रम संख्‍या

राज्‍य

जिल्हे

टॉवर्सची संख्‍या

1

आंध्र प्रदेश

8

429

2

बिहार

8

412

3

छत्‍तीसगढ़

16

1028

4

झारखंड

21

1054

5

मध्‍य प्रदेश

1

26

6

महाराष्‍ट्र

2

136

7

ओदिशा 

18

483

8

तेलंगण

14

118

9

उत्‍तर प्रदेश

3

179

10

पश्चिम बंगाल

5

207

एकूण

10 राज्‍य

96

4072

 

 

 

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 



(Release ID: 1533181) Visitor Counter : 126


Read this release in: English