आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

लखनौच्या स्कुटर्स इंडिया लिमिटेडच्या ताळेबंदाच्या पुनर्रचनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 23 MAY 2018 5:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 मे 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अर्थविषयक केंद्रीय समितीने लखनौच्या स्कुटर्स इंडिया लिमिटेडच्या ताळेबंदाच्या पुनर्रचनेला पुढील प्रकारे मंजुरी दिली आहे:

 

  1. संचित  तोट्यापोटी भारत सरकारच्या एसआयएलच्या भागभांडवलात 85.21 कोटी रुपये घट झाली आहे. ही घट 31.03.2013 रोजी अंमलात आली  असे मानण्यात येईल. आणि
  2. कंपनीला 2012-13 मध्ये देण्यात आलेल्या अनियोजित  कर्जावर व्याज गोठवणे आणि  1.89 कोटी रुपये मूळ रकमेच्या समभागात रूपांतरित करणे

 

या मंजुरींनंतर स्कुटर्स इंडिया लिमिटेडचा 2012-13 पासून पुढील वर्षांचा ताळेबंद नियमित होईल आणि त्यानुसार पुढील पुनर्रचना केली जाईल. यामुळे कंपनीच्या निर्गुंतवणुकीतील अडथळे दूर होणे अपेक्षित आहे.

 

 

 

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 



(Release ID: 1533170) Visitor Counter : 67


Read this release in: English