पंतप्रधान कार्यालय

लेहमध्ये कुशोक बकुळा रिंपोच जन्मशताब्दीच्या समारोप कार्यक्रमाला पंतप्रधानांची उपस्थिती, झोजिला बोगद्याच्या कामाच्या शुभारंभानिमित्त फलकाचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण

Posted On: 19 MAY 2018 4:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19  मे  2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरच्या एक दिवसाच्या भेटीत प्रथम लेहला भेट दिली. 19 व्या कुशोक बकुळा रिंपोच जन्मशताब्दीच्या समारोप कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहीले. झोजीला बोगद्याच्या कामाचा शुभारंभ करणाऱ्या फलकाचे अनावरणही पंतप्रधानांनी यावेळी केले.

14 किलोमीटर लांब झोजिला बोगदा भारतातील सर्वात लांब पल्ल्याचा रस्ते बोगदा आणि आशियातील सर्वात लांब दुहेरी बोगदा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीने यावर्षीच्या सुरुवातीलाच श्रीनगर-लेह मार्गावरील बालताल आणि मिनामार्ग दरम्यान बोगद्याच्या बांधकाम, परिचालन आणि देखभालीसाठी 6 हजार 800 कोटी रुपयांच्या एकूण खर्चाला मंजूरी दिली आहे. या बोगद्यामुळे झोजिला खिंड पार करण्यासाठी सध्या लागणारा साडेतीन तासांचा वेळ कमी होऊन केवळ 15 मिनिटात हे अंतर पार करता येईल. यामुळे या भागाचे आर्थिक आणि सामाजिक – सांस्कृतिक एकात्मिकरण व्हायला मदत होईल. याला धोरणात्मक महत्व देखील आहे.

19 व्या कुशोक बकुळा रिंपोच यांच्या समृद्ध योगदानाचे स्मरण पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना केले. दुसऱ्यांच्या सेवेकरता त्यांनी आयुष्य वेचले असे पंतप्रधान म्हणाले.

19 वे कुशोक बकुळा रिंपोच हे उत्तम राजनितीज्ञ होते असे ते म्हणाले.

जम्मू काश्मीरच्या तिनही भागांना आपण भेट देत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.

जम्मू काश्मीरला 25,000 कोटी रुपयांचे विकास प्रकल्प मिळणार असल्याचे सांगून या प्रकल्पांमुळे इथल्या जनतेवर सकारात्मक परिणाम होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 



(Release ID: 1532832) Visitor Counter : 104


Read this release in: English