सांस्कृतिक मंत्रालय

ललित कला अकादमीचे नियमित अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध शिल्पकार उत्तम पाचरणे यांची नियुक्ती

Posted On: 17 MAY 2018 5:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 मे 2018

 

ललित कला अकादमीचे नियमित अध्यक्ष म्हणून राष्ट्रपतींनी प्रसिद्ध शिल्पकार उत्तम पाचरणे यांची नियुक्ती केली आहे. सध्या ते गोवा कला अकादमीच्या सल्लागार समितीचे सदस्य, पु.ल.देशपांडे राज्य ललित कला अकादमीच्या सल्लागार समितीचे सदस्य आणि जन सेवा सहकारी बँक, बोरीवलीचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.

पाचरणे यांना 1985 मध्ये राष्ट्रीय ललित कला पुरस्कार, 1985 मध्ये महाराष्ट्र गौरव पुरस्कार, 1986 मध्ये कनिष्ठ राष्ट्रीय पुरस्कार आणि 2017 मध्ये प्रफुल्ला डहाणुकर फाऊंडेशनचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पाचरणे कार्यभार स्वीकारल्यापासून तीन वर्ष अकादमीच्या अध्यक्षपदी राहतील.

 

 

 

N.Sapre/S.Kane/D.Rane

 


(Release ID: 1532716) अभ्यागत कक्ष : 104
Read this releasein: English