वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

वाणिज्य विभागात डीजीटीआरची निर्मिती

Posted On: 17 MAY 2018 4:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 मे 2018

 

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात डीजीटीआर अर्थात डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेड रेमेडीजची निर्मिती करण्यासाठी वाणिज्य विभागाने अधिसूचना जारी केली आहे.

अँटी डंपिंग आयात शुल्काची भरपाई आणि सुरक्षेसह सर्व व्यापार पद्धतींसाठी डीजीटीआर ही सर्वोच्च राष्ट्रीय संस्था असेल. देशांतर्गत उद्योग आणि निर्यातदारांना यामुळे दिलासा मिळेल. डीजीएडी, डीजीएस आणि डीजीएफटी यांना डीजीटीआरने एका छत्राखाली आणले आहे. यामुळे 49 पदे कमी होतील.

डिजीटीआर ही बहु-सेवा संघटना असेल, ज्यात आंतरराष्ट्रीय व्यापार, सीमाशुल्क, महसूल, वित्त, अर्थशास्त्र, कायदा या क्षेत्रातील विविध अधिकारी असतील.

1997 पासून प्रलंबित असलेल्या डीजीटीआरच्या निर्मितीबद्दल वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी समाधान व्यक्त केले आहे. आपल्या देशांतर्गत उद्योगांना समान संधी पुरवण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण झाले आहे, असे ते म्हणाले.

 

 

 

N.Sapre/S.Kane/D.Rane


(Release ID: 1532601) अभ्यागत कक्ष : 105
Read this releasein: English