उपराष्ट्रपती कार्यालय

शहरे आर्थिक विकासाला चालना देतात, शहरी जनतेला पुरेशी घरे पुरवण्याची गरज – उपराष्ट्रपती

Posted On: 17 MAY 2018 3:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 मे 2018

 

शहरे आर्थिक विकासाला चालना देतात, त्यामुळे शहरी जनतेला पुरेशी घरे आणि अन्य आवश्यक सुविधा पुरवण्याची गरज आहे, असे उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. ते आज नवी दिल्लीत नेताजी नगर रहिवासी वसाहतीचा पुनर्विकास आणि नौरोजी नगर येथे जागतिक व्यापार केंद्राच्या पायाभरणी समारंभानंतर उपस्थितांना संबोधित करत होते. गृहनिर्माण राज्यमंत्री हरदीप सिंग पूरी आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

आपण गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्री असतांना ज्या कल्पना मांडल्या त्यांच्या पायाभरणी समारंभात सहभागी होणे ही आपल्यासाठी अभिमानाची आणि समाधानाची बाब असे ते म्हणाले.

सर्व नागरीकांना घरे पुरवण्याबरोबरच उत्तम पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. पर्यावरण आणि नैसर्गिक साधन संपत्तीचे रक्षण करुन शाश्वत विकास सुनिश्चित करायला हवा, असे ते म्हणाले.

 

 

 

N.Sapre/S.Kane/D.Rane

 

 



(Release ID: 1532587) Visitor Counter : 114


Read this release in: English