पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय

कॅग आणि पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या सचिवांनी स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत पुण्याजवळ शौचालय पिट रिकामा केला

Posted On: 17 MAY 2018 2:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 मे 2018

 

नियंत्रक आणि महालेखापाल राजीव मेहर्षी आणि पेयजल व स्वच्छता मंत्रालयाचे सचिव परमेश्वरन अय्यर यांनी आज सकाळी पुणे जिल्ह्यातील पांढरेवाडी ग्रामपंचायतीत ट्विन पिट शौचालयाचा एक शौचालय पिट रिकामा केला. ग्रामीण भारतात ट्विन पिट शौचालयाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडूच्या अतिरिक्त मुख्य सचिवांसह राज्यातील वरिष्ठ स्वच्छता अधिकारी अशा प्रकारच्या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

ट्विन-पिट शौचालय हे ग्रामीण भारतासाठी सुरक्षित शौचालय तंत्रज्ञान असून, जागतिक आरोग्य संघटना तसेच केंद्र सरकारनेही याची शिफारस केली आहे.

ग्रामीण भारतात ट्विन पिट शौचालयांना प्रोत्साहन देण्यासाठी सिने कलाकार अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांना घेऊन लवकरच एक अभियान सुरु करणार असल्याची घोषणा अय्यर यांनी यावेळी केली.

 

 

 

N.Sapre/S.Kane/D.Rane



(Release ID: 1532579) Visitor Counter : 137


Read this release in: English