मंत्रिमंडळ

भारत आणि कोलंबिया यांच्यात पारंपरिक औषध पद्धती क्षेत्रातल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 16 MAY 2018 6:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मे 2018

 

भारत आणि कोलंबिया यांच्यात पारंपरिक औषध पद्धती क्षेत्रात सहकार्य करण्याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने  मंजुरी दिली आहे.

यामुळे कोलंबियामधे भारतीय पारंपारिक औषध पद्धतीचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.

 या सामंजस्य करारामुळे प्रशिक्षणासाठी  तज्ञांचे आदान-प्रदान, पारंपरिक औषध पद्धतीमध्ये  संशोधन सहयोग यातून औषध विकास आणि पारंपरिक औषध क्षेत्रात नाविन्य पूर्ण शोधाना प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे.

 

 

 

N.Sapre/N.Chitale/D.Rane



(Release ID: 1532426) Visitor Counter : 102


Read this release in: English