मंत्रिमंडळ

निवडणूक व्यवस्थापन आणि प्रशासन क्षेत्रात सहकार्याबाबत भारत आणि सुरीनाम यांच्यातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 16 MAY 2018 6:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मे 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्‍यक्षतेखाली मंत्रिमंडळाने निवडणूक व्यवस्थापन आणि प्रशासन क्षेत्रात सहकार्याबाबत भारत आणि सुरीनाम यांच्यातील सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत उभय देशांदरम्यान निवडणूक प्रक्रियेच्या संघटनात्मक आणि तांत्रिक विकास क्षेत्रात परस्पर माहितीचे आदान -प्रदान, संस्थात्मक यंत्रणा बळकट करणे आणि क्षमता विकास आणि प्रशिक्षणासाठी ज्ञान आणि अनुभव  यांची देवाण-घेवाण तसेच नियमित चर्चा यांचा समावेश आहे.

या करारामुळे निवडणूक व्यवस्थापन आणि प्रशासन क्षेत्रात सहकार्यासह तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून द्विपक्षीय संबंधांना चालना मिळेल.

 

 

 

N.Sapre/S.Kane/D.Rane

 



(Release ID: 1532416) Visitor Counter : 59


Read this release in: English