मंत्रिमंडळ

भारत आणि इक्वेटोरियल गिनी यांच्यात पारंपरिक औषध प्रणाली क्षेत्रात सहकार्याबाबतच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 16 MAY 2018 6:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मे 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि इक्वेटोरियल गिनी यांच्यात पारंपरिक औषध प्रणाली क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य कराराला कार्योत्तर मंजुरी दिली आहे. या करारावर 8 एप्रिल 2018 रोजी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

या करारामुळे उभय देशांदरम्यान पारंपरिक औषध क्षेत्रात द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत होतील.

संशोधन, प्रशिक्षण अभ्यासक्रम, परिषदा / बैठका, तज्ञांची प्रतिनियुक्ती यासाठी लागणारा निधी आयुष मंत्रालयाच्या सध्याच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून वापरला जाईल.

 

 

 

 

N.Sapre/S.Kane/D.Rane

 

 



(Release ID: 1532412) Visitor Counter : 44


Read this release in: English