मंत्रिमंडळ

भारत आणि स्वाझीलंड दरम्यान आरोग्य आणि औषध क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 16 MAY 2018 6:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मे 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि स्वाझीलंड यांच्यातील आरोग्य आणि औषध क्षेत्रातील सहकार्याबाबतच्या सामंजस्य कराराला कार्योत्तर मंजुरी दिली आहे.

या कराराअंतर्गत पुढील क्षेत्रात सहकार्य केले जाईल –

  1. औषधे आणि फार्मास्युटिकल उत्पादने
  2. वैद्यकीय वापराची उत्पादने
  3. वैद्यकीय संशोधन
  4. वैद्यकीय उपकरणे
  5. सार्वजनिक आरोग्य
  6. संसर्गजन्य रोग नियंत्रण आणि देखरेख
  7. आरोग्य पर्यटन
  8. परस्पर हिताचे अन्य कुठलेही क्षेत्र

सहकार्याबाबत विस्तृत माहिती आणि कराराच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी एक कृती गट स्थापन केला जाईल.

 

 

 

N.Sapre/S.Kane/D.Rane



(Release ID: 1532410) Visitor Counter : 69


Read this release in: English