मंत्रिमंडळ

मेट्रो वाहतुकीला चालना


दिल्ली मेट्रो कॉरिडॉरचे नोएडा सिटी सेंटरपासून सेक्टर-62 पर्यत विस्तारीकरण करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 16 MAY 2018 6:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मे 2018

 

नोएडा शहरातील सार्वजनिक वाहतुकीला गती देण्याच्या उद्देशाने, दिल्ली मेट्रो कॉरिडॉरचे नोएडा सिटी सेंटरपासून सेक्टर-62 पर्यत विस्तारीकरण करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी  दिली. पंतप्रधान नरेंद्र मोडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. उत्तरप्रदेशात असलेल्या सेक्टर-62 या स्थानकापर्यतचा हा मार्ग 6.675 किलोमीटर लांब आहे. या विस्तारीकरणासाठी 1967 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.त्यापैकी 340.60 कोटी रुपये निधी केंद्र सरकार देईल.

दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळातर्फे हा रेल्वेमार्ग विकसित केला जाईल. या विस्तारीकरणामुळे, नोएडामध्ये राहणाऱ्या अनेक लोकांना नवी दिल्लीत येण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होईल. त्यामुळे या उपनगरात लोकवस्ती वाढून दिल्ली शहरातील गर्दी आणि पर्यायाने सुविधांवरील ताण कमी होईल. दिल्लीत होणारी वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. या प्रकल्पाचे काम सुरु झाले आहे.

हा प्रकल्प केंद्रीय मेट्रो कायदा, मेट्रो रेल्वे (कन्स्ट्रक्शन ऑफ वर्क्स) कायदा 1978 आणि मेट्रो रेल्वे कायदा 2002 च्या चौकटीत घेण्यात येणार असून, वेळोवेळी यामध्ये सुधारणा करण्यात येतील.

 

 

B.Gokhale/R.Aghor/D.Rane



(Release ID: 1532408) Visitor Counter : 59


Read this release in: English