आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या दृष्टीने हरयाणामधील ‘नांगल चौधरी’ गावात एकात्मिक बहु-आयामी लॉजिस्टिक केंद्र म्हणजेच ‘माल गाव’ विकसित करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 16 MAY 2018 6:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मे 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या बैठकीत, उद्योग धोरण आणि प्रोत्साहन विभागाच्या खालील प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये:-

  1. हरयाणा राज्यातील नांगल चौधरीगावात 886.78 एकर परिसरात एकात्मिक बहु-आयामी लॉजिस्टिक केंद्र म्हणजेच माल गाव(Freight Village) विकसित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. विशेष हेतूसाठी विकसित तत्वावर आधारित हा प्रकल्प दोन टप्प्यात विकसित केला जाईल.
  2. या प्रकल्पासाठी, पहिल्या टप्यात 1029.49 कोटी रुपये निधी तर दुसऱ्या टप्प्याला आज तत्वतः मान्यता देण्यात आली.
  3. राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास आणि अमलबजावणी न्यास या प्रकल्पात 763 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
  4. या प्रकल्पामुळे. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पासाठी पायाभूत सुविधा निर्माण होतील. तसेच, इंधनबचत, रोजगार निर्मिती, निर्यातीला चालना, वाहन खर्चात बचत, प्रदूषणबचत असे अनेक फायदे या प्रकल्पामुळे होणार आहेत. 

एकात्मिक बहु-आयामी लॉजिस्टिक केंद्रामुळे चार हजार थेट तर सहा हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणे अपेक्षित आहे.

 

 

 

N.Sapre/R.Aghor/D.Rane

 



(Release ID: 1532383) Visitor Counter : 102


Read this release in: English