पंतप्रधान कार्यालय

आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात एक नौका उलटून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Posted On: 15 MAY 2018 8:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 मे 2018

 

आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात एक नौका उलटून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान म्हणाले, ‘आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात एक नौका उलटल्यामुळे व्यथित झालो आहे. मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. बेपत्ता नागरिक सुखरूप असो अशी मी प्रार्थना करतो.’

 

 

 

N.Sapre/S.Kane/D.Rane



(Release ID: 1532246) Visitor Counter : 71


Read this release in: English