वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
वाणिज्य मंत्रालयामध्ये नवीन ‘डायरेक्टोरेट जनरल ऑफ ट्रेड रेमिडीज’ (डीजीटीआर) विभाग
प्रविष्टि तिथि:
09 MAY 2018 7:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मे 2018
वाणिज्य मंत्रालयामध्ये सध्या कार्यरत असलेल्या ‘डायरेक्टोरेट जनरल ऑफ अँटी डंपिंग अँड अलाईड ड्युटीज’ या विभागाऐवजी आता ‘डायरेक्टोरेट ऑफ ट्रेड रेमिडीज’ हा विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे.
व्यापार, वाणिज्य व्यवहार सुलभतेने आणि जलद गतीने व्हावेत याचा विचार करुन कार्य रचनेमध्ये बदल करण्यात आले आहेत. यासाठी नियमावलीत आवश्यक असणाऱ्या सुधारणाही करण्यात आल्या आहेत.
नव्यान सुरु करण्यात आलेला ‘डीजीटीआर’ हा वाणिज्य विभागाशी संलग्न विभाग असणार आहे. ‘कमीत कमी शासन आणि जास्तीत जास्त प्रशासन’ या पंतप्रधानांच्या उद्दिष्टांचा विचार करुन ‘डीजीटीआर’ विभागाची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षा चौकटीच्या अधीन राहून या विभागाला कार्य करता येणार आहे.
N.Sapre/S.Bedekar/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1531783)
आगंतुक पटल : 128
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English