सांस्कृतिक मंत्रालय
मुंबईच्या नेहरु विज्ञान केंद्रामध्ये ‘मशिनड् टू थिंक’ प्रदर्शनाचे डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते उद्घाटन
Posted On:
09 MAY 2018 6:46PM by PIB Mumbai
मुंबई, 9 मे 2018
आधुनिक काळात मानवी बुद्धिमत्तेला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड दिल्यास प्रगती वेगाने होऊ शकणार आहे असे प्रतिपादन वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी आज मुंबईत केले. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त मुंबईतल्या नेहरु विज्ञान केंद्राच्या वतीने आज ‘मशिनड् टू थिंक’ या तंत्रज्ञानावर आधारित प्रदर्शन भरवण्यात आले, या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ‘मशिनड् टू थिंक’ हस्तपुस्तिकेचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. या हस्तपुस्तिकेमध्ये प्रदर्शनाची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
दिवसेंदिवस बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा विचार केला तर आता चौथी औद्योगिक क्रांती होत आहे, असे म्हटले जाते. आगामी काळात माहिती आणि तंत्रज्ञान या क्षेत्राला येणारे महत्व लक्षात घेऊन नेहरु विज्ञान केंद्राने ‘मशिनड् टू थिंक’ हे दालन तयार केले आहे.
या दालनामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून किती गुंतागुंतीची आणि कोणत्या प्रकारची मोठमोठी कामे वेगाने कशा पद्धतीने करता येऊ शकतात याचे अनोखे प्रदर्शन भरवण्यात आले.
To view the glimpses of this new exhibition please visit to
https://www.youtube.com/watch?v=64urtgpgIkY&feature=share
B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar
(Release ID: 1531750)
Visitor Counter : 119