निती आयोग
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराला भारतामध्ये असलेल्या अमर्याद संधी लक्षात घेऊन निती आयोग आणि गुगल यांच्यामध्ये सहकार्याचा करार
Posted On:
07 MAY 2018 4:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मे 2018
भारतामध्ये विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी अमर्याद संधी आहेत. यासंबंधी गुगलशी सहकार्य करुन निती आयोग प्रशिक्षणाची सुविधा निर्माण करणार आहे.
हॅकेथॉन, स्टार्ट अपचे पालन पोषण आणि संशोधनासाठी निधी देणे यासाठी निती आयोग आणि गुगल यांनी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात केलेल्या करारावर निती आयोगाच्या सल्लागार ॲना रॉय आणि गुगलचे भारत-दक्षिण पूर्व आशियाचे उपाध्यक्ष रंजन आनंदन यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत उपस्थित होते.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराविषयी भारताचे धोरण निश्चित करुन योजना आखण्याचे कार्य निती आयोग करत आहे. त्यासाठी गुगलच्या मदतीने प्रशिक्षण देण्यात येणार असून कृत्रिम बुद्धिमत्तेचा जास्तीत जास्त वापर करण्यात येणार आहे.
कृषी,शिक्षण,आरोग्य सुविधा आणि इतर क्षेत्रात असलेल्या समस्या सोडवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यावर भर देण्यात येणार आहे.
N.Sapre/S.Bedekar/P.Malandkar
(Release ID: 1531607)
Visitor Counter : 131