रेल्वे मंत्रालय
रेल्वे मंत्रालयाने रेल्वे स्थानक परिसरच्या सौंदर्यीकरणासाठीचे पुरस्कार जाहीर
62 प्रवेशिकांमधून, बल्हारशाह आणि चंद्रपूर (मध्य रेल्वे)ला प्रथम क्रमांक, मधुबनी (पूर्व मध्य रेल्वे) आणि मदुराई (दक्षिण रेल्वे)ला द्वितीय क्रमांक, गांधीधाम (पश्चिम रेल्वे) कोटा (पश्चिम मध्य रेल्वे) आणि सिकंदराबादने (दक्षिण मध्य रेल्वे) पटकावला तृतीय क्रमांक
Posted On:
04 MAY 2018 5:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 मे 2018
सृजनशीलतेसह स्वच्छतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्थानिक कलाकारांच्या सहभागाने ज्या रेल्वे स्थानक परिसरांचे सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण झाले होते, अशा सर्व क्षेत्रीय रेल्वे कार्यालयांकडून, रेल्वे मंत्रालयाने प्रवेशिका मागवल्या होत्या. कार्यकारी संचालक (स्थानक विकास), दक्षिण-मध्य रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (सिस्टम), कार्यकारी संचालक (पर्यटन) तसेच ईशान्य फ्रंटीयर रेल्वेच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या मूल्यांकन समितीने 11 क्षेत्रीय कार्यालयांकडून प्राप्त झालेल्या 62 प्रवेशिकांची समीक्षा केली.
भारतीय रेल्वे मध्ये सर्वाधिक सुंदर स्थानक म्हणून सर्वोत्कृष्ट कलेचे प्रदर्शन करणाऱ्या मध्य रेल्वेच्या बल्हारशाह आणि चंद्रपूर स्थानकांना (नागपूर विभाग) प्रथम क्रमांक देण्यात आला. बल्हारशाह आणि चंद्रपूर रेल्वे स्थानकांवर ताडोबा अभयारण्याची चित्र आणि मूर्तिकलेने सुशोभित करण्यात आले आहे. दोन्ही स्थानकांना 10 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

बल्हारशाह रेल्वे स्थानक

चंद्रपूर रेल्वे स्थानक
बिहारमधील मध्य रेल्वेच्या मधुबनी रेल्वे स्थानक आणि दक्षिण रेल्वेच्या मदुराई रेल्वे स्थानकातल्या द्वितीय क्रमांक देण्यात आला आहे. मधुबनी स्थानकावर मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात 100 कलाकारांनी 10 दिवसात मधुबनी चित्र काढली होती, द्वितीय पुरस्कार विजेत्या स्थानकांना 5 लाख रुपयांचे बक्षिस देण्यात आले.
कोटा स्थानक (पश्चिम मध्य रेल्वे), गांधीधाम स्थानक (पश्चिम रेल्वे) तसेच सिकंदराबाद स्थानकाला (दक्षिण मध्य रेल्वे) तृतीय पुरस्कार जाहीर केला आहे. तृतीय पुरस्कार विजेत्या स्थानकांना तीन लाख रुपयांचे बक्षिस देण्यात आले.
N.Sapre/S.Mhatre/D.Rane
(Release ID: 1531402)
अभ्यागत कक्ष : 88