रेल्वे मंत्रालय

मुंबईतल्या पहिल्या महिला विशेष उपनगरी रेल्वेला 26 वर्ष पूर्ण

5 मे 1992 जगातली पहिली महिला विशेष ट्रेन चर्चगेट ते बोरिवली दरम्यान धावली

Posted On: 04 MAY 2018 4:39PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 4 मे 2018

 

5 मे हा दिवस भारतीय रेल्वेच्या महिला प्रवाशांसाठी विशेष आनंदाचा दिवस आहे. या दिवशी जगातली पहिली महिला विशेष उपनगरी गाडी चर्चगेट ते बोरिवली या स्थानकादरम्यान 5 मे 1992 रोजी धावली. उद्या या घटनेला 26 वर्ष पूर्ण होणार असून हा दिवस रेल्वेच्या इतिहासात मैलाचा दगड म्हणून साजरा केला जातो. 1993 साली याच रेल्वेगाडीचा प्रवास विरारपर्यंत वाढविण्यात आला.

नियमित लोकल गाड्यांमध्ये सकाळी आणि संध्याकाळच्या गर्दीच्यावेळी प्रवेश करणे महिला प्रवाशांसाठी अत्यंत कठीण झाले आहे. त्यामुळे ही महिला विशेष गाडी नोकरदार महिलांसाठी एक वरदान ठरली आहे. गेल्या 26 वर्षांपासून उपनगरी मार्गांवर यशस्वीपणे या गाड्या धावत आहेत.

 

महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी भारतीय रेल्वेने अनेक पावलं उचलली आहेत. अनेक रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही आणि टॉकबॅक सुविधा लावण्यात आली आहे. टॉकबॅक व्यवस्थेमध्ये महिला अडचणीच्या प्रसंगी थेट गार्डशी संवाद साधू शकतात शिवाय इमरजन्सी बटन दाबू शकतात.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Kor


(Release ID: 1531339) Visitor Counter : 177
Read this release in: English