गृह मंत्रालय

पद्म पुरस्कारांसाठीची ऑनलाईन नामांकन प्रक्रिया सुरू

Posted On: 02 MAY 2018 2:41PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 मे 2018

 

वर्ष 2019 ला प्रजासत्ताक दिनाला जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी ऑनलाईन नामांकन किंवा शिफारस पाठवण्याची प्रक्रिया 1 मे पासून सुरू झाली असून हे नामांकन पाठवण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2018 आहे.

केंद्रीय मंत्रालय, विभाग, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश, भारतरत्न तसेच पद्मविभूषण पुरस्कार विजेते, विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्था यांच्याकडून या पुरस्कारांसाठी नामांकन मागवण्यात आले आहेत. विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या तसेच विशेष कामगिरी करणाऱ्या लोकांच्या कार्याची सविस्तर माहिती घेऊन उचित नामांकन पाठवण्याचे आवाहन या सर्व संस्थांना करण्यात आले आहे.

ही नामांकने तसेच शिफारसी केवळ ऑनलाईन स्वरुपातच स्वीकारली जातील. देशातले सर्व नागरिक स्वत:सह इतर कोणाचेही नामांकन अथवा शिफारस पाठवू शकतात. या नामांकनासोबत संबंधित व्यक्तीची सविस्तर माहिती दिलेल्या आराखड्यात भरणे आवश्यक आहे. नागरिक www.padmaawards.gov.in या पोर्टलवरून ही नामांकन भरू शकतात. सरकारी अधिकारी आणि कर्मचारी तसेच सार्वजनिक संस्थांमध्ये कार्यरत कर्मचारी यांचे या पुरस्कारासाठी नामांकन अथवा शिफारस केली जाऊ शकत नाही. मात्र, यात डॉक्टर आणि शास्त्रज्ञ यांचा अपवाद करण्यात आला आहे.

 

N.Sapre/R.Aghor/P.Kor


(Release ID: 1531173) अभ्यागत कक्ष : 63
Read this releasein: English