श्रम आणि रोजगार मंत्रालय
ईपीएफओच्या डेटा सेंटरमधून कुठलीही माहिती उघड झाली नसल्याचे स्पष्टीकरण
Posted On:
02 MAY 2018 6:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मे 2018
ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या डेटा सेंटरमधून काही माहिती उघड झाल्याच्या वृत्ताचा संघटनेने इन्कार केला आहे.
माहिती लिक होण्याचा धोका लक्षात घेऊन पूर्वकाळजी म्हणून ईपीएफओने सामायिक सेवा केंद्राशी निगडित सर्व सेवा केंद्रे बंद केली आहेत.
या संदर्भात सोशल मीडियावर आलेल्या वृत्ताच्या आधारावर सामायिक सेवा केंद्राच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एक पत्रही मिळाले होते. ही माहिती आणि आकडेवारी सुरक्षित ठेवण्यासाठी पावलं उचलण्याची विनंती त्या पत्रात करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर ईपीएफओने जारी केलेल्या स्पष्टीकरणात असा धोका गृहीत धरून त्यानुसार माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमी काळजी घेतली जाते. यावेळीही सर्व तपास करण्यात आला असून कुठेही माहिती उघड झाल्याचं निष्पन्न झालं नाही, असं संघटनेनं म्हटले आहे.
N.Sapre/R.Aghor/P.Kor
(Release ID: 1531049)
Visitor Counter : 143