आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
लखनऊ, चेन्नई आणि गुवाहाटीमध्ये विमानतळ पायाभूत सुविधांची वाढ
लखनऊ, चेन्नई आणि गुवाहाटी विमानतळावरील पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण आणि विस्ताराला केंद्रीय मंत्री मंडळाची मंजुरी
प्रविष्टि तिथि:
02 MAY 2018 5:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मे 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक विषयावरील केंदीय मंत्रीमंडळाने चेन्नई, गुवाहाटी आणि लखनऊ विमानतळावरील एकात्मिक टर्मिनल्सचे अद्ययावतीकरण आणि विस्तारला मंजुरी दिली आहे. यासाठी अनुक्रमे 2467 कोटी रुपये, 1383 कोटी रुपये आणि रु. आणि 1232 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती:
तीन प्रकल्पांची ठळक वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत
लखनऊ विमानतळ:
सध्याच्या 16292 चौ.मी. टर्मिनल इमारतीसह नवीन एकात्मिक टर्मिनलचे बांधकाम 88,000 चौ.मी. वर केले जाईल. ह्या विमानतळाची वार्षिक प्रवासी वाहतूक क्षमता 2.6 दशलक्ष आंतरराष्ट्रीय आणि 11 देशांतर्गत असेल. वाढलेली प्रवासी क्षमता हाताळण्यासाठी नवीन टर्मिनल इमारत 2030-31 पर्यंत सज्ज होईल.
चेन्नई विमानतळ:
35 एमपीएए हाताळण्याच्या वार्षिक क्षमतेसह 197000 चौ.मी.च्या सध्याच्या प्रस्तावित जागेसह प्रस्तावित टर्मिनल इमारतीचे एकूण बांधकाम क्षेत्र 336000 चौ.मी. असेल. GRIHA-4 स्टार रेटिंग मिळविण्याच्या हेतूने नवीन टर्मिनल इमारतीमध्ये पर्यावरणपूरक बाबींचा समवेश करण्यात येणार आहे.
गुवाहाटी विमानतळ:
9 एमपीपीएच्या वार्षिक क्षमता (जुन्या आणि नवीन टर्मिनल्स) हाताळण्यासाठी नवीन टर्मिनल इमारत 102500 चौरस मीटर क्षेत्रात बांधण्यात येणार आहे. वाढलेल्या प्रवाश्यांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी इमारत 2026-27 पूर्णतः सज्ज होईल.
N.Sapre/S.Mhatre/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1531016)
आगंतुक पटल : 157
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English